इथं चिमुकल्यांच्या जिवाशी होतोय खेळ

By admin | Published: March 26, 2017 02:14 PM2017-03-26T14:14:14+5:302017-03-26T14:16:20+5:30

कऱ्हाडातील स्वामीबागेतील खेळण्यांची स्थिती गंभीर : डागडुजीअभावी साहित्य पडून; अनेक खेळण्यांची दुरवस्था

The game is being played with the lives of the little girls here | इथं चिमुकल्यांच्या जिवाशी होतोय खेळ

इथं चिमुकल्यांच्या जिवाशी होतोय खेळ

Next

आॅनलाईन लोकमत

कऱ्हाड : तुटलेल्या पत्र्यांची घसरगुंडी, मोडलेल्या बागड्यांचे झोपाळे अन ढासळेलेल्या खांबावरील फिरते रिंगण अशा दुरावस्थेतील साहित्यांचे चित्र येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरातील स्वामीबागेत दिसत आहे. मोडतोड झालेली खेळणी ही सध्या चिमुकल्यांच्या जिवावर बेतत आहेत. परिणामी, उद्याने असूनसुद्धा त्यामध्ये खेळणाऱ्या चिमुकल्यांना आनंद मिळेनासा झाला आहे. खेळण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र जणू या ठिकाणी पहायला मिळत आहे.

शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक उद्यानामुळे शहराच्या सौदर्यांतही भर पडते. तर नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून उद्यानाकडे पाहिले जाते. या उद्देश्याने शहरातील सुशोभीकरणात भर टाकण्यासाठी पालिकेतर्फे चार ठिकाणी आकर्षक उद्याने उभारण्यात आली. सध्या शहरात चार ठिकाणी असलेल्या उद्यानांची पालिकेकडून नियमित देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. त्यामुळेच या उद्यानातील खेळण्यांची मोडतोड झाली आहेत.


कऱ्हाड पालिकतर्फे शहरात दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर स्वामीबाग, सावरकर पुतळा परिसरात नाना-नानी पार्क, सुपरमार्केट परिसरात पी. डी. पाटील उद्यानह्ण तर यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसरातील उद्यान अशा चार ठिकाणी विविध फुलझाडांसह आकर्षक खेळण्यांची उद्याने उभारण्यात आली. या उद्यानातील साहित्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.

पालिकेने सुमारे अडीच कोटी रुपए खर्चून शनिवार पेठेत उभारलेल्या पी़ डी़ पाटील उद्यानाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रीतिसंगम बागेवरील ताण कमी करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेले हे उद्यान सकाळी व सायंकाळीच सुरू ठेवण्यात येते. या ठिकाणी सुरक्षारक्षक तसेच सफाई कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून कितीप्रमाणात साफसफाई केली जाते, हा संशोधनाचा विषय आहे. सुमारे अडीच कोटी रुपए खर्चून तयार करण्यात आलेल्या बगीच्याचीही सद्या दुरावस्था झाली आहे.

यापेक्षा गंभीर परिस्थिती सोमवार पेठेतील नाना-नानी पार्कची आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी कमी आणि स्थानिक युवकांच्या गप्पा मारण्याचेच हे पार्क आहे, अशी स्थिती येथे पाहायला मिळत आहे. पार्क परिसरातच वीज वितरण कंपनीचा मोठा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. त्यामुळे सायंकाळी खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेच्या दुर्लक्षामुळे यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी बांधण्यात आलेल्या स्वामीच्या बागेतील लॉनचे व पादचारी मागार्चे सध्या काम सुरू आहे. याठिकाणी मुलांना खेळता यावे म्हणून बसविण्यात आलेल्या खेळण्याचीही मोडतोड झालेली आहे. येथे खेळायला येणाऱ्या मुलांकडून आम्हाला खेळायचयं पणं खेळणी साहित्य कुठाय. असे सांगत मोडलेल्या झोपाळा, घसरगुंडी व गोल रिंंगण आणि खेळण्याच्या साहित्यासाहाय्याने चिमुकले खेळत आहेत. पालिकेने शहरातील दुरावस्थेत असलेल्या या उद्यानांमध्ये लवकरात लवकर सुविधा उभाराव्यात अशी, पर्यटक व नागरिकांकडून मागणी होत आहे.

पावलो पावली जिवाची भिती !

बागेत खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांकडून उड्या मारणे, पळणे, एकमेकांना धक्का देणे अशा प्रकारच्या कृती केल्या जातात. अशा यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या ठिकाणी असलेल्या स्वामीबागेतील खेळण्याचे साहित्य हे लोखंडी असून त्यात ते ठिकठिकाणी तुटलेले आहे. त्यामुळे यावर चिमुकले पडल्यास त्यांच्या जिवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बागेच्या विकासाठी पाच लाखाची तरतुद

कऱ्हाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरातील स्वामी बागेतील सुशोभिकरण, दुरूस्ती, सुरक्षा आदि घटकांसाठी पालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या अर्थसंक ल्पात पाच लाख रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

या सुविधांचा अभाव

१) स्वच्छ पिण्यासाठी पाणी
२) खेळण्यांचे साहित्यांची डागडुजी
३) स्वच्छतागृहांची गैरसोय

Web Title: The game is being played with the lives of the little girls here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.