सीए इंटरमिजिएट परीक्षेत गंधाली देव हिचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:17+5:302021-02-10T04:39:17+5:30
सातारा : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत सातारा शहरातील एकेज कॉमर्स अॅकॅडमीची विद्यार्थिनी ...
सातारा : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत सातारा शहरातील एकेज कॉमर्स अॅकॅडमीची विद्यार्थिनी गंधाली देव हिने देशात १६ वा क्रमांक पटकावून शैक्षणिक क्षेत्रात सातारचे नाव उज्ज्वल केले.
देशात या परीक्षेचा निकाल १५ टक्के असला तरी, एकेज ॲकॅडमीचा निकाल ७० टक्के असल्याचे अॅकॅडमीचे संचालक सीए आनंद कासट यांनी सांगितले. वैयक्तिक मार्गदर्शन, अद्ययावत क्लासरूम्स, तज्ज्ञ शिक्षक यामुळे ‘एकेज’ला विद्यार्थ्यांची प्रथमपसंती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा या अॅकॅडमीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अॅकॅडमीच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीए फौंडेशन व इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण होऊन अॅकॅडमीच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (वा.प्र)
फोटो : ०९ गंधाली देव
गंधाली देव या विद्यार्थिनीच्या सत्कारप्रसंगी सीए आनंद कासट, नीशा लाहोटी, मेहूल मेहता, अभिलाषा मेहता, प्रणव हिंगमिरे उपस्थित होते.