मालकीच्या वादात सापडले गणेशमंदिर

By admin | Published: July 2, 2015 11:45 PM2015-07-02T23:45:06+5:302015-07-03T01:19:59+5:30

पोलिसांकडून टाळे : तीन गावांचा बसेना मेळ

Ganesh temple found in ownership dispute | मालकीच्या वादात सापडले गणेशमंदिर

मालकीच्या वादात सापडले गणेशमंदिर

Next

अजित जाधव- महाबळेश्वर -महाबळेश्वर : माचुतर येथील गणेश मंदिराच्या मालकीवर शिंदोळा व भेकवली या तीन गावांनी हक्क सांगितल्याने हे मंदिर वादात सापडले आहे. तीन गावच्या बैठकीत एकमत न झाल्याने अखेर पोलिसांनी या मंदिराला टाळे टोकल्याने गणेशभक्ताची व पर्यटकाची माठी गैरसोय होत आहे.
महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर अंतरावर मेढा रस्त्यावर हे मंदिर आहे. हे मंदिर तीन गावांच्या हद्दीवर आहे. मंदिराची जागा वनविभागाची आहे. एका धनिकाने या मंदिराची दुरूस्ती करून सुशोभीकरण केले. दैनंदिन पुजेसाठी तेथे एका पुजाऱ्याची व्यवस्था केली. तसेच दानपेटी बसविण्यात आली आहे. दानपेटीतून जमा होणाऱ्या रकमेतून दैनंदिन खर्च व पुजारी याचा खर्च करण्याची जबाबदारी येथील एका व्यक्तीवर सोपविण्यात आली आहे. गेली काही वर्षे ही व्यवस्था विनबोभाटपणे सुरू होती.
अलीकडील काही वर्षात हे मंदिर शहरातील गणेशभक्तांचे तसेच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. महाबळेश्वर दर्शन फेरीमध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक भेट देतात. त्यामुळे दानपेटीत चांगली रक्कम मिळूू लागली आहे. नेमकी ही बाब भेकवली ग्रामस्थांच्या लक्षात आली व प्रथम या मंदिराच्या मालकीवर हक्क सांगितला. ३ जून रोजी गणेश मंदिरातील दानपेटी उचलून गावात नेली. तेथे ग्रामस्थांच्या समोर पेटीतील रक्कम गावाकडे जमा करण्यात आली.
प्रत्येक गाव हे मंदिर आमचे असल्याचे सांगत आहे, त्यामुळे वाद मिटण्याऐवजी चिघळत चाललेला आहे. दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी तहसीलदार अतुल म्हेत्रे याच्या उपस्थितीत तीन गावच्या प्रमुखाची बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी, गटविकास अधिकारी जी. पी. शिंदे, दोन माजी नगराध्यक्ष किसन शिंदे व बबन ढेबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत तीन गावांकडून वेगवेगळे प्रस्ताव येत होते. एका गावच्या प्रस्तावाला इतर गावची मडळी विरोध करत होती. त्यामुळे बैठकीतून तोडगा निघत नव्हता. तीन गावांचा समावेश करून मंदिराचा ट्रस्ट स्थापन करण्याबाबतही काहींनी सूचना केली; परंतु भेकवली ग्रामस्थ याला विरोध करीत होते. शेवटी तीन गावांचा वाद मिटवावा, तोवर या मंदिराला पोलिसांनी टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला.
रोज सकाळी पूजा झाल्यानंतर या मंदिराला टाळे ठोकले जातात. गले तीन दिवस या मंदिराला टाळा असल्याने भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दानपेटी
पळविल्याने संताप
भेकवली ग्रामस्थांनी दानपेटी नेल्याची खबर शिंदोळा व माचुतर ग्रमस्थांना समजताच या दोन्ही गावांत संतापाची लाट उसळली. माचुतर गावात काही प्रमुख मंडळी एकत्र आले व त्यानी या मंदिराला टाळे ठोकले व भेकवली ग्रामस्थांविरूध्द दानपेटी चोरी करण्याची तक्रार महाबळेश्वर पोलिसात दिली. पोलिसानी तक्रार अर्ज घेतला; परंतु कोणावरही गुन्हा दाखल केला नाही. मात्र मंदिराला ठोकलेले टाळे काढले तेव्हापासून या मंदिराचा वाद येथे सुरू झाला आहे. दरम्यान, २४ जून रोजी पुन्हा भेकवली ग्रामस्थानी दानपेटी उघडली व पुन्हा जोरदार वाद सुरू झाला.

Web Title: Ganesh temple found in ownership dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.