Ganesh Visarjan2018 : साताऱ्यात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 08:07 PM2018-09-23T20:07:03+5:302018-09-23T20:09:16+5:30
साताऱ्यात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यात वाजण्यापूर्वीच गळा आवळल्याने रविवारी डीजेशिवाय मिरवणूक सुरू आहे.
सातारा : साताऱ्यात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यात वाजण्यापूर्वीच गळा आवळल्याने रविवारी डीजेशिवाय मिरवणूक सुरू आहे.
ऐतिहासिक साताऱ्यात रविवारी दुपारपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. अनेक गणेशोत्सव मंडळांनी ढोल बँड पथक लावले आहेत. तर काही मंडळांच्या मिरवणुकीत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके केली जात आहेत.
साताऱ्यात डीजे वाजणारच, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीकडे तरुणाईचे लक्ष लागले होते. परंतु पोलिसांनी खबरदारी घेत जिल्ह्यातील सर्व डीजे यंत्रणा सील केली. यामुळे डीजेमुक्त मिरवणूक सुरू आहे.
प्रशासनाने तयार केलेले कृत्रिम तलाव, पालिकेचा पोहण्याचा तलाव तसेच संगम माहुलीतील कृष्णा नदीपात्रात विसर्जन सुरू आहे.