घरफोड्या करणारी सातारची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:16 AM2019-07-23T00:16:52+5:302019-07-23T00:18:02+5:30
अटक केलेल्या टोळीमध्ये जावेद अनिल काळे (वय २२, रा. फडतरेवाडी), करण वरिसऱ्या काळे (३२, रा. भांडेवाडी), निकाल लत्या काळे (४८, रा. कोकराळे), अभिजित मंज्या शिंदे (२२, रा. सिद्धेश्वर किरोली) व दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सातारा जिल्ह्यातील आहेत.
सातारा : सांगली व सातारा जिल्हा परिसरातील दरोडा, घरफोड्या अन् चोरीचे तब्बल ८५ गुन्हे करणारी टोळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. त्यांच्याकडून ७ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. यापूर्वी जप्त केलेला मुद्देमाल मिळून एकूण १३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अटक केलेल्या टोळीमध्ये जावेद अनिल काळे (वय २२, रा. फडतरेवाडी), करण वरिसऱ्या काळे (३२, रा. भांडेवाडी), निकाल लत्या काळे (४८, रा. कोकराळे), अभिजित मंज्या शिंदे (२२, रा. सिद्धेश्वर किरोली) व दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सातारा जिल्ह्यातील आहेत.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली, मांडवे व पुसेसावळी येथे गंभीर स्वरूपाच्या तीन दरोड्यांच्या घटना घडल्या होत्या. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले.
पोलिसांनी तब्बल एक महिना सातारा जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक टोळ्या आणि त्यांची कार्यपद्धती तपासून दरोड्यातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी वेशांतर करून ठिकठिकाणी सापळे रचून सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील वडूज, पुसेगाव, औंध, कोरेगाव, रहिमतपूर, म्हसवड, दहिवडी व सांगली जिल्ह्यातील विटा परिसरात तब्बल ८५ चोºया, दरोडे व घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ७ लाख २० हजारांचे २० तोळे सोने व ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे सुमारे १ किलो वजनाचे दागिने, मोबाईल, घड्याळ, वाहने आदी मुद्देमाल ताब्यात घेतला. याच आरोपींकडून यापूर्वी ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या टोळीकडून आत्तापर्यंत एकूण १३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, संजय जाधव, विजय सावंत, वडूजचे पोलीस निरीक्षक अशोकराव पाटील आदींनी सहभाग घेतला होता.