Maharashtra Election 2019 : छोटा राजनच्या भावाचा पत्ता कट; भाजपाकडून दिगंबर आगवणे यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:27 PM2019-10-04T17:27:21+5:302019-10-04T17:30:48+5:30

फलटण विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत भाजपाकडून दिगंबर आगवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Gangster chhota rajan brother deepak nikalje assembly ticket cancelledt; BJP's Digambar Agaveen's nomination | Maharashtra Election 2019 : छोटा राजनच्या भावाचा पत्ता कट; भाजपाकडून दिगंबर आगवणे यांना उमेदवारी

Maharashtra Election 2019 : छोटा राजनच्या भावाचा पत्ता कट; भाजपाकडून दिगंबर आगवणे यांना उमेदवारी

Next
ठळक मुद्देआरपीआय पक्षाचे उपाध्यक्ष असलेले दीपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी देण्यात आली होती. माढाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आगवणे यांना एबी फॉर्म देतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

फलटण - रिपब्लिकन पक्षाने (आरपीआय) कुख्यात गुंड छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची फलटणमधून बुधवारी जाहीर केलेली उमेदवारी अचानक रद्द केली. त्यामुळे दीपक निकाळजे यांचा पत्ता कट झाला आहे.  त्यांच्या जागी आता दिगंबर आगवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपामधून विरोध झाल्याने निकाळचे यांना उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळत आहे. फलटण विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत भाजपाकडून दिगंबर आगवणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयला भाजपाने सहा जागा सोडल्या आहेत. आठवले यांनी त्यापैकी चार मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले होते. आरपीआय पक्षाचे उपाध्यक्ष असलेले दीपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करून आगवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. नाट्यमय घडामोडी घडत काल सायंकाळी भाजपकडून दिगंबर आगवणे यांची उमेदवारी जाहीर केली. माढाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आगवणे यांना एबी फॉर्म देतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर फलटण मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले होते. 

फलटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधील रासप रयत आणि रिपब्लिकन पक्षाने या जागेवर दावा करत असताना रिपब्लिकन पक्षाने रिपाईचे उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र नाट्यमय घडामोडीनंतर दिगंबर आगवणे यांचे नाव पुढे आले. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली मात्र महायुतीतून कोण याबाबत बऱ्याच दिवसापासून चर्चा रंगल्या होत्या भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक दिगंबर आगवणे हे महायुतीतर्फे प्रमुख दावेदार होते दिगंबर आगवणे यांना कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळावे यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते जागावाटपात रिपब्लिकन पक्षाला हा मतदारसंघ आल्याची  केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घोषणा करून फलटण तालुक्यातील दीपक निकाळजे यांची उमेदवारी जाहीर केली होती. प्रारंभी दीपक निकाळजे यांचे अचानक नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या दीपक निकाळजे खरोखरच इच्छुक आहेत की नाही यावर चर्चा झडू लागल्या तर दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधून दिगंबर आगवणे यांच्या नावासाठी आग्रह धरला  रामदास आठवले यांच्याकडे त्यांनी दिगंबर आगवणे यांची उमेदवारी योग्य कशी हेही पटवून दिले
दुसरीकडे दिगंबर आगवणे यांची उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. मतदारसंघातही आगवणे यांच्या उमेद्वारीवरून विविध चर्चा झडू लागल्या होत्या. त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांच्या भावना ते खा. रणजितसिंह यांच्याकडे पोहचवत होते खा. रणजितसिंह यांनीही आगवणे यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती
तब्बल दोन दिवस चर्चेचे दिवस - रात्र तुफान चालू होते, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माणचे माजी आ. जयकुमार गोरे यांनीही आगवणे यांच्या उमेदवारीसाठी तगादा लावला शेवटी रामदास आठवले यांनीही दीपक निकाळजे यांच्याशी चर्चा करून त्यांची उमेदवारी रद्द करुन दिगंबर आगवणे यांचे नाव जाहीर केले यात रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी दिगंबर आगवणे यांचे नाव जाहीर केले असले तरी दिगंबर आगवणे यांनी भाजपचा अधिकृत एबी फार्म जोडल्याने ते भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार दिसत आहेत

Web Title: Gangster chhota rajan brother deepak nikalje assembly ticket cancelledt; BJP's Digambar Agaveen's nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.