Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 06:11 PM2020-08-31T18:11:19+5:302020-08-31T18:13:56+5:30

महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा वर्षांपासून हा उत्सव साजरा करत आहे.

Ganpati Festival - Ganpati Bappa Morya's triumph in London, welcome to mind | Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत

Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत

Next
ठळक मुद्दे लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागतकेळघरमधील कुटुंबाने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती

सायगाव : महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा वर्षांपासून हा उत्सव साजरा करत आहे.

केळघर येथील गणेश वसंतराव गाडवे हे नोकरीनिमित्त लंडन येथे स्थायिक आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी लंडनमध्ये स्थायिक असलेले मराठीजन गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव निमित्ताने महाराष्ट्राच्या अनोख्या परंपरेची जगाला ओळख होत आहे.

यावर्षी कोरोनाचा कहर असल्याने लंडनमधील गणेशोत्सव साजरा करायला मर्यादा आल्याचे गणेश गाडवे यांनी सांगितले. सोशल डिस्टन्सचा अवलंब करुन यावर्षी लंडनमध्ये बाप्पाचा उत्सव सुरू आहे. गणेश व त्यांची पत्नी मोनिका हे दोघेही लंडनमध्ये नोकरी करत आहेत. आपल्या संस्कृतीचा विसर न पडता ते गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतात.
विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी बसवलेली गणेश मूर्ती शाडूपासून बनवली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव त्यानिमित्ताने साजरा होतोय. प्रसादाचे मोदक, लाडू ही घरीच तयार केले जातात. लंडनमध्ये दुर्वा, खाऊची पाने ही सहजपणे उपलब्ध होतात. गेल्या वर्षी त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती गणेशोत्सव साजरा करताना साकारली होती. तसेच लंडन ब्रिजचा देखावा मागील वर्षी केला होता.

आपल्या घरापासून लांब असूनही गोऱ्या साहेबांच्या देशात मराठमोळा गणेशोत्सव तिथल्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहे. लंडनमधील हा अनोखा मराठमोळा गणेशोत्सव राज्याच्या परंपरेची साक्ष देत आहे.


आम्ही इंग्लडमध्ये राहूनही कोरोनजन्य परिस्थिती असतानाही भारतीय संस्कृतीतील गणरायाचा उत्सव साजरा करीत आहोत. बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न झालेले पाहून मनाची शक्तीही वाढवली आहे.
- गणेश गाढवे,
मूळ केळघर, सध्या लंडन

Web Title: Ganpati Festival - Ganpati Bappa Morya's triumph in London, welcome to mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.