शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:18 PM2021-02-10T17:18:31+5:302021-02-10T17:20:08+5:30

environment Satara-शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाश्यांनी केला आहे.

Garbage burning in Shirwal for three months, environmental damage | शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी

शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी

Next
ठळक मुद्देशिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

शिरवळ : शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाश्यांनी केला आहे.
आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हे महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना बसला असून कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामपंचायतीतर्फे शिरवळचा कचरा सटवाई कॉलनी व फुलमळ्यालगत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभागाच्या जागेत अनधिकृतपणे टाकण्यात येत आहे. कचऱ्याला अचानकपणे आग लागून परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण होतो.

ग्रामपंचायतीने येइील कचरा प्रकल्प दुसरीकडे हलवावा या मागणीचा ठराव ग्रामसभा व विविध मार्गे ग्रामपंचायत सदस्यांसहित रहिवाश्यांनी शिरवळ ग्रामपंचायतीकडे अनेकदा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. कचरा डेपो तीन महिन्यांपासून धुमसत असतानाही शिरवळ ग्रामपंचायतीकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाश्यांनी केला आहे.

फुलमळ्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये शिरवळ ग्रामपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. येथील विहिरीसह बंधारा व स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Web Title: Garbage burning in Shirwal for three months, environmental damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.