Satara: कचरा गोळा करणारी घंटागाडी, चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 07:15 PM2024-11-20T19:15:11+5:302024-11-20T19:16:57+5:30

उंडाळे : उंडाळे येथील ग्रामपंचायतची कचरा गोळा करणारी घंटागाडी व चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या ...

Garbage collector, attempt to set fire to driver in Undale Satara district | Satara: कचरा गोळा करणारी घंटागाडी, चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न

Satara: कचरा गोळा करणारी घंटागाडी, चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न

उंडाळे : उंडाळे येथील ग्रामपंचायतची कचरा गोळा करणारी घंटागाडी व चालकाला पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संशयित फरार झाला. सुदैवाने चालक बाळासाहेब कुंभार थोडक्यात बचावले. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. 

घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, उंडाळे ग्रामपंचायतची घंटागाडी कचरा गोळा करून कचरा डेपोत डंपींग  करण्यासाठी गेली होती. कचरा डंपींग करुन परताना अंकुश रामचंद्र मुळीक याने घंटागाडी अडवून आमच्या शेताजवळील गटर्स का साफ करत नाही, गटर्स साफ केल्याशिवाय कचरा येथे टाकायचा नाही म्हणून सांगितले आहे ना असे म्हणत घंटागाडीवर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने चालक बाळासाहेब कुंभार थोडक्यात बचावले. कुंभार यांनी आग विझवली. 

घंटागाडी पेटवून अंकुश मुळीक हा फरार झाला आहे. कराड पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याघटनेची फिर्याद ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण, सरपंच संगीता माळी, उपसरपंच अजित कदम, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील व दादा पाटील यांनी दिली आहे.  सदर ईसमावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील माने करीत आहेत.

Web Title: Garbage collector, attempt to set fire to driver in Undale Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.