पालिकेच्या आवारातच कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:59 PM2017-09-18T23:59:33+5:302017-09-18T23:59:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : पालिकेच्या कर्मचाºयांनी गोळा केलेल्या कचºयाची ट्रॉली तीन दिवसांपासून आंबेडकर नगरात कचºयासह उभी करण्यात आली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त नागरिक व विरोधी पक्षातील पदाधिकाºयांनी कचºयाने भरलेली ट्रॉली रविवारी रात्री पालिकेच्या दारात आणून रिकामी केली. तसेच पालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालिकेच्या वतीने शहरातील कचरा दररोज गोळा केला जातो. तीन दिवसांपूर्वी कर्मचाºयांनी ट्रॉलीमध्ये कचरा गोळा केला. कचºयाने भरलेली ही ट्रॉली येथील आंबेडकर नगरात उभी होती. तीन दिवसांपासून ट्रॉली एकाच ठिकाणी उभी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला होता.
दुर्गंधीमुळे संतप्त झालेल्या येथील रहिवाशांनी तसेच विरोधी पक्षातील नागरिकांनी रविवारी रात्री कचºयाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली थेट पालिकेसमोर घेऊन आले. याठिकाणी नागरिकांनी ट्रॉलीतील कचरा रिकामा करून पालिकेचा निषेध व्यक्त केला.
ट्रॅक्टर चालकासह तिघांवर गुन्हा
पालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकल्याप्रकरणी पालिकेच्या वतीने पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अखील काझी, माजी नगरसेवक संजय सोनवणे, ट्रॅक्टर चालक उमेश कोळी या तिघा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे कर्मचारी सुनील माडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, फिर्यादीत म्हटले आहे की, ‘आंबेडकर नगरात डिझेल संपल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली उभी करण्यात आली होती. ट्रॉलीत स्वच्छता करतेवेळी गोळा करण्यात आलेला कचरा व गटारातील गाळ भरण्यात आलेला होता. रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक पालिकेच्या प्रवेशद्वारावर कचºयाने भरलेला ट्रॅक्टर आला. प्रवेशद्वारासमोर कचरा ओतून संबंधित तिघांनी सुपरवायझर प्रवीण मंडले यांना ‘जर कचरा उचलला तर तुम्हाला खूप महागात पडेल’ असे म्हणून उपस्थित सफाई कामगारांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.