कचरा डेपोतील कचरा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:38+5:302021-03-14T04:34:38+5:30

महाबळेश्वर : स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या कचरा डेपोवर टाकण्यात आलेला ओला कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी ...

Garbage in waste depots is fatal | कचरा डेपोतील कचरा ठरतोय जीवघेणा

कचरा डेपोतील कचरा ठरतोय जीवघेणा

Next

महाबळेश्वर : स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या कचरा डेपोवर टाकण्यात आलेला ओला कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकही गाई खात असल्याने त्यांना अनेक रोगांनी पछाडले आहे. यापैकी अनेक गाई मृत्यूशी झुंज देत आहेत.

महाबळेश्वर पालिकेचा कचरा डेपो हा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग लागले आहेत. महाबळेश्वर पालिका ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करते, परंतु टाकताना तो एकाच जागेवर टाकला जातो आहे. ओल्या अथवा सुक्या अशा कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. रोज कित्येक टन कचरा गोळा होतो व हा सर्व कचरा कारवी आळा कचरा डेपोवर गोळा केला जातो. या ठिकाणी टाकण्यात येणारा ओला कचरा हा जंगलातील प्राण्यांचा, पशु-पक्ष्यांचा तसेच या परिसरातील पाळीव गाईंचे खाद्य बनला आहे. असा ओला कचरा हा नासून जातो, तर काही वेळेला अशा ठिकाणी किडे पडतात. सडलेला कचरा खाऊन अनेक गाईंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा घटना येथे वरचेवर घडत असतात. आजही मोठ्या प्रमाणावर मोकाट गाई या ठिकाणी कचरा खाण्यासाठी गोळा होतात. या ठिकाणी येणाऱ्या अनेक गाईंना अनेक व्याधींनी पछाडलेले आहे. अनेक गाई या मृत्यूशी झुंज देत आहेत.

कचऱ्यावर प्रक्रिया करणारे येथे युनिट पालिकेने बसविले आहे. परंतु ये युनिट कित्येक महिन्यांपासून बंद पडले आहेत. बंद स्थितीत राहिल्याने हे युनिट गंजले आहे. आता पालिकेने नवीन युनिट येथे आणून बसविले आहे. परंतु ते सुरू करण्यास पालिकेला मुहूर्त सापडला, त्यामुळे पालिका नेमके काय काम करते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घनकचरा व्यवस्थापनावर पालिकेचे करोडो रुपये खर्च होतात. हा खर्च नेमका कशावर खर्च होतो, हे समजू शकले नाही.

फोटो १३महाबळेश्वर-कचरा

महाबळेश्वर पालिकेच्या कचराडेपोत ओला व सुका कचरा एकत्रच टाकला जातो. तोच कचरा जनावरे खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (छाया : अजित जाधव)

Web Title: Garbage in waste depots is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.