तरडगावच्या ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:17 PM2017-08-08T14:17:47+5:302017-08-08T14:20:58+5:30

तरडगाव : ‘आर्थिक अडचणीमुळे एखादा गरीब कुटुंबातील हुशार, होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न राहता त्याला शिक्षणाचा योग्य लाभ मिळावा, या हेतूने फलटण तालुक्यातील तरडगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी त्यांना मिळणारा वार्षिक मानधन दरवर्षी गावातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तो प्रत्यक्षात अंमलात देखील आणला आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांना आता ग्रामपंचायतीचा आधार मिळणार असून, या निर्णयाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

Garg panchayat members to pay tribute to students of Tadgaon! | तरडगावच्या ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ! 

तरडगावच्या ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ! 

Next
ठळक मुद्देऐतिहासिक निर्यणाचे ग्रामस्थांमधून कौतुक विद्यार्थ्यांना आता ग्रामपंचायतीचा आधार मासिक बैठकीत ठराव

तरडगाव : ‘आर्थिक अडचणीमुळे एखादा गरीब कुटुंबातील हुशार, होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित न राहता त्याला शिक्षणाचा योग्य लाभ मिळावा, या हेतूने फलटण तालुक्यातील तरडगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सर्व सदस्यांनी त्यांना मिळणारा वार्षिक मानधन दरवर्षी गावातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तो प्रत्यक्षात अंमलात देखील आणला आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांना आता ग्रामपंचायतीचा आधार मिळणार असून, या निर्णयाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

उपसरपंच अमोल गायकवाड यांनी सुचविलेल्या या कल्पनेबाबत सर्व सदस्यांची चर्चा होऊन या आगळ्यावेगळ्या उपक्रमास सर्वांनी संमती दर्शवली. त्यानंतर मासिक बैठकीत पदाधिकारी व सदस्यांना मिळणारा वार्षिक मानधन हे दरवर्षी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील हुशार, होतकरू व शालेय शिक्षण घेताना आर्थिक परिस्थिती अडसर ठरत असलेल्या विद्यार्थ्यांला देण्याचा ठराव करण्यात आला. 

यावेळी जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या येथील रोहन अडसूळ या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी या मानधनाचा धनादेश त्याची आई रोहिणी अडसूळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी सभापती वसंतराव गायकवाड, सरपंच रेश्मा गायकवाड, उपसरपंच अमोल गायकवाड, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष विजयकुमार शहा, ग्रामपंचायत सदस्या भारती शिनगारे आदी मान्यवर, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या महिन्यात आयोजित केलेला गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम व आता वार्षिक मानधनाबाबत घेतलेला या निर्णयामुळे शैक्षणिकदृष्ट्या गावचा चांगला विकास झाला पाहिजे, यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यापूर्वी मानधनाच्या रकमेतून एखादी वस्तू खरेदी करण्यात येत असे. तसेच गेल्यावर्षी सुरेश कोंडिबा अडसूळ या ग्रामपंचायत कर्मचाºयाचे निधन झाले असता मदत म्हणून त्यावेळचे मानधन सर्वांनी त्यांच्या कुटुंबास दिले होते.

‘दरवर्षी मानधनाची रक्कम देताना सर्व पदाधिकारी, सदस्य गावातील व्यक्ती, शिक्षक वर्ग यांच्याशी चर्चा करून त्यावेळची व विद्यार्थ्याची परिस्थिती त्याची गुणवत्ता पाहून त्यानंतरच खºया गरजू विद्यार्थ्यास ही रक्कम सुपूर्द केली जाईल,’ असे उपसरपंच अमोल गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वार्षिक मानधनाची रक्कम दरवर्षी गरजू व होतकरू विद्यार्थ्यास देण्याचा ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून, यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकावरील मुलाचा शैक्षणिक भार थोडासा कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच गावच्या शैक्षणिकदृष्ट्या आपण देखील सदैव प्रत्यक्षात कृतीतून सहकार्य करण्यास केव्हाही तयार आहोत.
- विजयकुमार शहा, अध्यक्ष 
पाणीपुरवठा समिती, तरडगाव

Web Title: Garg panchayat members to pay tribute to students of Tadgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.