‘माणुसकी’च्या पाणपोईतून मिळतोय ‘गारवा’
By admin | Published: April 12, 2017 10:55 PM2017-04-12T22:55:13+5:302017-04-12T22:55:13+5:30
कऱ्हाडात सोय : सामाजिक संघटना, मित्रमंडळांचा पुढाकार; प्रवाशांपासून ते चक्क गाढवांसाठीही पाणपोई
कऱ्हाड : सध्या कडक उन्हाळा निर्माण झाला असल्याने तापमानाचा पारा चाळीस अंशावर पोहोचला आहे. अशात घोटभर पाण्यासाठी घसा कोरडा पडेपर्यंत लोकांना फिरावं लागत आहे. शहरातही तीच परिस्थिती आहे. मात्र, शहरात येणाऱ्या प्रवासी व पर्यटकांचे पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून येथील काही सार्वजनिक मंडळे व रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पाणपोई सुरू केल्या आहेत. माणुसकीच्या भावनेतून सुरू केलेल्या या पाणपोई सध्या नागरिकांच्या कोरड्या घशाला ‘गारवा’ मिळून देत आहेत.
सध्या वाढलेल्या उन्हामुळे ऐन एप्रिल महिना हा मेप्रमाणे जाणवू लागला आहे. शहरात तर जिकडे-तिकडे थंडगार ज्युस सेंटर, लिंबू सरबत विक्रीची दुकाने वाढली आहेत. असे सहज व कुठेही उपलब्ध होणारे थंडगार पाणी लोकांना व प्रवाशांना पिता यावे म्हणून शहरात काही सार्वजनिक मंडळे, रिक्षा संघटना तसेच युवक मित्र-परिवार यांच्या वतीने शहरात अकराहून अधिक ठिकाणी थंड पाण्याच्या पाणपोर्इंची सोय केली आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी पालिकेच्या वतीने पिण्याच्या पाणपोर्इंची सोय करण्यात आली आहे खरी. मात्र, त्या पाणपोर्इंची अवस्था आज ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशी झाली आहे. काही ठिकाणी पाणपोई आहेत. मात्र, त्यामध्ये पाणीच नाही. तर काही ठिकाणी पाणपोई तसेच पाणीही आहे. मात्र, ते पिण्यास योग्य नाही. येथील पालिका व शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी साधे पाणी तर कर्मचाऱ्यांसाठी मात्र, वॉटर कूलरच शुद्ध थंडगार पाण्याची सोय करण्यात आली आहे. याउलट शहरात ठिकठिकाणी मातीच्या माठात त्याला कापडी फडके गुंडाळून थंडगार शुद्ध पाणी लाकडाच्या मंडपाच्या तसेच झाडांच्या सावलीच्या आडोशाला ठेवण्यात आले आहेत.
सध्या वातावरणात उष्माचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. शहरात छोट्या-मोठ्या कामासाठी येणाऱ्या लोकांना घोटभर पाण्यासाठी ज्युस सेंटर व हॉटेलमध्ये जावं लागत आहे. फुक्कट मिळणारे थंडगार पाणी पिण्याचे सोडून कृत्रिम पद्धतींनी तयार केलेल्या ज्युस व शीतपेयांचेच सेवन लोकांकडून केले जात आहे. (प्रतिनिधी)
शीतपेयांमध्ये असणारे घटक...
उन्हाळा ऋतूमध्ये शरीराला थंडगार पदाथास्वत:साठी थंडगार कूलर अन् पंखे...
शहरातील शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी थंडगार कूलर, फ्रीज अन् पंखे यांची सोय केलेली दिसून येत आहे. मात्र, नागरिकांसाठी ना कूलर, ना थंड पाणी अशा सोयी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना अशा कार्यालयांमध्ये येताना स्वत: बरोबर पाणी घेऊन यावे लागत आहे.र् ंची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत असते. अशात जर थंडगार पाणी पिले की, त्याचा कमी प्रमाणात परिणाम होतो. थंडगार असलेल्या विविध ज्युस, सरबत तसेच कोल्ड्रिंक्समध्ये साखर, कृत्रिम रंग व वास, सायट्रिक अॅसिड, कॅफेन, सोडियम या घटकांचा समावेश करण्यात आलेला असतो.