लोणंद बाजारात गरवा कांदा तीन हजार रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:07+5:302021-01-08T06:09:07+5:30
लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवारी कांदा बाजारात गरवा ६०० व हळवा कांद्याची ३०५ पिशवी ...
लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवारी कांदा बाजारात गरवा ६०० व हळवा कांद्याची ३०५ पिशवी आवक झाली. मागील आठवडयाच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे.
गरवा कांदा ३००० रुपये, तर हळवा कांद्याला २६०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला,’ अशी माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.
गरवा कांदा नंबर एक २२०० ते ३००० रुपये, हळवा कांदा नंबर एक १९०० ते २६०० रुपये गरवा कांदा नं. दोन १३०० ते २२०० रु. हळवा कांदा नं. दोन १२०० ते १९००, गरवा कांदा गोल्टी ७०० ते १३०० रु. हळवा गोल्टी ८०० ते १२०० रु. दर निघाले.
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.