गौरव सोहळा पन्नास वर्षांचा... उपस्थिती लक्ष-लक्ष कार्यकर्त्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:09 PM2017-11-12T23:09:38+5:302017-11-12T23:10:27+5:30

Gaurav Ceremony for 50 years ... Attendance Attendance Workers | गौरव सोहळा पन्नास वर्षांचा... उपस्थिती लक्ष-लक्ष कार्यकर्त्यांची

गौरव सोहळा पन्नास वर्षांचा... उपस्थिती लक्ष-लक्ष कार्यकर्त्यांची

Next


सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. याचा गौरव करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी साताºयात सर्वपक्षीय सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सातारी सत्काराला एक लाख जनता उपस्थित राहावी, यासाठी संयोजकांनी नेटके नियोजन केले आहे.
सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येथील विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, माजी आ. प्रभाकर घार्गे, निवृत्त अधिकारी प्रभाकर देशमुख, काँगे्रसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक विजयकुमार काटवटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे, राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांचा सत्कार सोहळा सोमवार, दि. १३ रोजी जिल्हा परिषद मैदानावर होणार आहे. त्यासाठी स्टेज व पे्रक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे. कार्यक्रमास पालकमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला एक लाख लोक उपस्थित राहतील, यासाठी संयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येकाची मैदानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोन्ही राजे उपस्थित राहणार
गेल्या काही दिवसांपासून साताºयात घडणाºया घडामोडींमुळे सोमवारच्या गौरव सोहळ्यास साताºयाचे दोन्ही राजे उपस्थित राहणार का? याकडे साºयांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शरद पवारांवरील प्रेमापोटी खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था
जिल्ह्याच्या कानाकोपºयातून लोक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने शाहू स्टेडियम, पोलिस परेड ग्राउंड, सैनिक स्कूल मैदान व शहरातील इतर मैदानांवर गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
शेतकºयांच्या हस्ते गौरव
संसदीय राजकारणाला पन्नास वर्षे पूर्ण करणाºया खासदार शरद पवार यांच्या सत्काराला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांचा सत्कार जिल्ह्यातील एका शेतकºयाच्या हस्ते करण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: Gaurav Ceremony for 50 years ... Attendance Attendance Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.