गौरवगाथा वाचन हे सुसंस्कारांचे बीजारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:22+5:302021-02-11T04:40:22+5:30
येथील शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयात विवेक दीप बापुजींच्या कार्यकर्तृत्त्वाची गौरवगाथा असलेल्या अनमोल ग्रंथाचे वाचन सुरू आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ...
येथील शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयात विवेक दीप बापुजींच्या कार्यकर्तृत्त्वाची गौरवगाथा असलेल्या अनमोल ग्रंथाचे वाचन सुरू आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. उपप्राचार्य प्रा. मोहन पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी, कनिष्ठ विभागाचे प्रा. राजेंद्र भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. अभय जायभाये म्हणाले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या गौरव गाथेचे वाचन हा या महाविद्यालयातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. बापूजी जे जीवन जगले, जे कष्ट, त्याग त्यांनी केला, त्याचे विवेचन विविध मान्यवरांनी विवेक दीप ग्रंथात शब्दबद्ध केले आहे. यातील प्रत्येक शब्द हा प्रत्येक गुरुदेव कार्यकत्यार्साठी अमृताचा डोस आहे. या डोसाच्या बळावरच एक परिपूर्ण शिक्षक उभा राहील आणि त्याच्या हातून शिक्षणाचे, ज्ञानदानाचे पवित्र कार्य घडून येईल. आधुनिक काळात शिक्षणाचे स्वरूप बदलत चालले आहे. बदलणाऱ्या या शिक्षण पद्धतीचा पाया शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे यांनी घातला आहे. विद्यार्थी ज्ञान, विज्ञानाने समृद्ध झाला पाहिजे. मात्र, त्याबरोबरच तो सुसंस्कारी असला पाहिजे. ही त्यांची विचारधारा होती. म्हणूनच त्यांच्या विचारांच्या गौरवगाथेचे वाचन सर्वांसाठी उपयुक्त आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रा. अभय जायभाये यांचा प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. सुभाष कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सचिन बोलाईकर यांनी आभार मानले.