सोशल मीडियामुळे गौरीला मिळाले तिचे घर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:41 AM2021-04-23T04:41:33+5:302021-04-23T04:41:33+5:30
वाई : मुंढवा, पुणे येथील गौरी मानसिक संतुलन बिघडल्यामुळे दिसेल त्या वाटेने भटकत होती. पोलिसांच्या माध्यमातून यशोधनचा सहारा मिळाला ...
वाई : मुंढवा, पुणे येथील गौरी मानसिक संतुलन बिघडल्यामुळे दिसेल त्या वाटेने भटकत होती. पोलिसांच्या माध्यमातून यशोधनचा सहारा मिळाला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरीला तिचे घर मिळाले. आता ती तिच्या घरी सुखरूप पोहोचली आहे.
याविषयी यशोधन ट्रस्टचे संचालक सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांनी दिलेली माहिती अशी की, गाैरीचं लग्न करून दिलं हाेतं; पण सासूने तिला नांदू दिलं नाही. सततच्या छळामुळे गाैरी वैतागली आणि नवर्याचं घर साेडून आईकडे गेली. गाैरीनं एका मुलीला जन्म दिला; पण सततच्या तणावानं गाैरीला मानसिक आजार झाला. ओषध उपचार केले. तिला बरं वाटू लागलं. आईनं दुसरं एक स्थळ बघितलं आणि गाैरीचं लग्न करून दिलं.
गाैरीचा दुसरा संसार सुरू झाला; पण दुसरा नवरा दारू पिऊन मारत हाेता. आता मार खाणं गाैरीला असह्य झालं. मानसिक आजारांनी ग्रासलेल्या गाैरीनं घर साेडलं आणि रस्त्यानं चालू लागली. चालत चालत शिरवळला पाेहोचली. पाेलिसांनी चाैकशी केली तर ती फक्त हसत हाेती. काेराेनाच्या काळात काेणी मदतही करत नाही, अशा वेळी मात्र तिला यशाेधनमध्ये आधार दिला.
ती मानसिक आजारी असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला मनाेविकार तज्ज्ञांकडे दाखविले. डाॅक्टरनी औषधे सुरू केली. गाैरीला घर शाेधून द्यायचं हाेतं; पण तिला काही सांगता येत नव्हतं, म्हणून साेशल मीडियाचा आधार घेण्याचं ठरवलं आणि व्हिडिओ साेशल मीडियावर शेअर केला. बघता बघता ताे व्हायरल झाला. अनेक लाेकांचे फाेन आले आणि तिच्या वडिलांचा नंबर मिळाला. संपर्क झाला; पण गरीब असल्यानं त्यांनी साेडण्याची विनंती केली. सर्व कागदपत्रे तयार करून तिला साईनाथ नगर मुंढवा या ठिकाणी घेऊन गेले. आई-वडिलांची भेट झाली. गाैरीला सुखरूप पाेहोचविले. डाॅक्टरांनी दिलेली औषधे तिच्या नवर्याकडे दिली. नवर्यानंही औषध उपचार करून व्यवस्थित सांभाळण्याचा शब्द दिला.
चौकट
मानसिक आजारापुढं गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही. मानसिक आजार झाला तर औषध उपचाराशिवाय पर्याय नाही. गाैरीसारख्या अनेक मुली उपचार न मिळाल्यामुळे रस्त्यावर आहेत. अशा सर्वांना मदत करण्याचे काम यशाेधन ट्रस्टच्या माध्यमातून करत आहे.
- रवी बोडके,
संचालक यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट.