शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांची पिढीला माहिती व्हावी : स्वप्निल धनावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 AM2021-02-20T05:51:12+5:302021-02-20T05:51:12+5:30

कुडाळ : ‘छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांची माहिती आजच्या पिढीला झाली पाहिजे. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणांचे संवर्धन करणे ...

Generations should know about Gadkot, which testifies to Shivaraya's prowess: Swapnil Dhanawade | शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांची पिढीला माहिती व्हावी : स्वप्निल धनावडे

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांची पिढीला माहिती व्हावी : स्वप्निल धनावडे

Next

कुडाळ : ‘छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांची माहिती आजच्या पिढीला झाली पाहिजे. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ठिकाणांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यादृष्टीने सखोल अभ्यास करून दुर्गमोहीम ैकरायला हवी,’ असे मत शिवक्रांती हिंदवी स्वराज्य महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल धनावडे यांनी व्यक्त केले.

स्वराज्याचे शास्रागार असणाऱ्या किल्ले वैराटगडाच्या पायथ्याशी शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव व शिवक्रांती शिवभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रवीण कदम, खजिनदार सुनील कांबळे, जावळीचे तालुकाध्यक्ष शिवा गोरे, नवनाथ कोकरे, निखिल घोरपडे, सुमित कांबळे, प्रतीक कदम, संदेश धोत्रे, निखिल कुर्लेकर, तनुजा जाधव, प्रतीक्षा ढवळे, राष्ट्रवादीच्या तालुका महिला अध्यक्षा रूपाली भिसे, ग्रामपंचायत सदस्य बारीक कदम, सारिका गुठाळे, सुरेश पार्टे, नवनाथ धनावडे उपस्थित होते. याप्रसंगी जिवा महाले यांचे वंशज जयश्री महाले यांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शौर्य मर्दानी आखाडा सातारा यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

धनावडे म्हणाले, आजच्या पिढीला शिवरायांचा इतिहास कळवा या उद्देशाने सहा वर्षे आमची संघटना कार्यरत आहे. यासाठी दुर्गमोहीम राबविण्यात येत आहे. परदेशी पर्यटन आपल्याकडे येऊन छत्रपतींच्या साम्राज्याचा अभ्यास करत आहेत. याकरिता आपणही मुलांना गड-किल्ल्यांची सफर घडवली पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत ११८ मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतलेले आहे.

किसन पांडुरंग साळुंखे तसेच सैन्यदलात निवड झालेल्या जावळीच्या शिल्पा चिकणे, अंकिता देशमुख, राजश्री सपकाळ या रणरागिणींना शिवक्रांती शिवभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निशांत चव्हाण, प्रतीक ढवळे या बालकांनी शिवचरित्रावर उत्तम पोवाडे सादर केले.

फोटो: १९कुडाळ

वैराटगडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात शिवक्रांती हिंदवी सेनेच्या वतीने किसन साळुंखे यांचा शिवक्रांती शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Generations should know about Gadkot, which testifies to Shivaraya's prowess: Swapnil Dhanawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.