घोटभर पाण्यासाठी वानरसेना जीवावर उदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:22+5:302021-04-29T04:30:22+5:30

पेट्री : कास-बामणोली मार्गावर यवतेश्वर घाटात नेहमीच पर्यटकांचे मनोरंजन करणारी वानरसेना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करून एकेक थेंब झेलण्यासाठी जीवाचा ...

Generous to the ape army for drinking water! | घोटभर पाण्यासाठी वानरसेना जीवावर उदार !

घोटभर पाण्यासाठी वानरसेना जीवावर उदार !

Next

पेट्री : कास-बामणोली मार्गावर यवतेश्वर घाटात नेहमीच पर्यटकांचे मनोरंजन करणारी वानरसेना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करून एकेक थेंब झेलण्यासाठी जीवाचा आटापिटा करतानाचे चित्र दिसत आहे. यामुळे अतिपावसाच्या सह्याद्रीत पशुपक्ष्यांना पाण्यासाठी काय करावे लागते, हे पाहावे लागेल. तसेच घोटभर पाण्यासाठी यवतेश्वर घाटातील ही वानरसेना जीवावर उदार होताना दिसत आहे.

साताऱ्याच्या पश्चिमेकडील यवतेश्वर, कास परिसराचा भाग जास्त पर्जन्याचा म्हणून ओळखला जातो. येथील वनसंपदा देखील समृद्ध आहे. कित्येक अनेकविध पशुपक्ष्यांचा वावर या परिसरात आहे, परंतु गेल्या काही दिवसांत साताऱ्याच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढत आहे. त्यामुळे वातावरण तापून अंगाला उन्हाचे चटके बसत आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास-बामणोली भागात जाण्यासाठी यवतेश्वर घाटातूनच जावे लागते. यवतेश्वर घाटातील कोसळणारा धबधबा तसेच त्या समोरील कठड्यांवर एका ओळीत बसलेली वानरसेना या परिसरात पर्यटनास आलेल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. कोरोनापूर्वी पावसाळ्यात धबधबा कोसळू लागल्यानंतर असंख्य पर्यटक या धबधब्यासमवेत तसेच वानरसेनेसमवेत फोटोसेशन, सेल्फी काढताना दिसतात. दरम्यान, बच्चे कंपनीदेखील त्यांना स्नॅक्स खायला देतात. सध्या उष्णतेची दाहकता अधिकच वाढलेली असून पावसाळ्यात पूर्णपणे कोसळणारा धबधबा सध्या पूर्णपणे कोरडा पडत चालला आहे. या धबधब्यावरून जवळील गावाची पाण्याची पाईपलाईन गेली असून, तिला काही अल्पस्वरुपात गळती असल्याने धबधब्यावर अत्यल्प ओलावा होत आहे. त्यातूनच टिपकणारा एकेक थेंब या वानरसेनेची तहान भागवत असून गळक्या जलवाहिनीचा आधार वानरसेनेला मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शहराच्या पश्चिमेकडील परिसरात झाडाझुडपांचा निवारा तसेच रानमेवा पशुपक्ष्यांची भूक भागवत असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उरतोच. त्यांना आपली तहान भागविणे अवघड झाले आहे. हे वास्तव भीषण चित्र यवतेश्वर घाटातील धबधब्यावर उंच कपारी पार करून अगदी थोडासा ओलावा शोधत तहान भागविण्यासाठी एकेक थेंब तोंडात झेलण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणाऱ्या या वानराकडे पाहिल्यावर लक्षात येते.

चौकट :

काही ठिकाणी पाणी आटल्याची स्थिती..

शहराच्या पश्चिमेचा भाग अतिवृष्टीचा असला तरी तीव्र डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी भूगर्भात न मुरता मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. बहुतांशी ठिकाणी असणारी तळी, झरे पाणवठ्यावरील पाणी घटण्याच्या मार्गावर असून, पाण्याचे प्रमाण अत्यल्प होऊ लागले आहे. काही ठिकाणी पाणवठे आटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

28पेट्री वॉटर

पोटभर पाण्यासाठी यवतेश्वर घाटातील ही वानरसेना जीवावर उदार होताना दिसत आहे.

Web Title: Generous to the ape army for drinking water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.