सासकल रस्त्याचे काम मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:07+5:302021-06-09T04:49:07+5:30

फलटण : सासकल (ता. फलटण) गावच्या रस्त्याचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर राहिला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे किंवा ...

Get the Saskal road work in order | सासकल रस्त्याचे काम मार्गी लावा

सासकल रस्त्याचे काम मार्गी लावा

Next

फलटण : सासकल (ता. फलटण) गावच्या रस्त्याचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर राहिला आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करणे किंवा कायमस्वरूपी डांबरीकरण करणे ही कित्येक वर्षांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

फलटण तालुक्यात अनेक निवडणुका झाल्या, मग त्या ग्रामपंचायतींच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, विधानसभा व लोकसभेची असतील, लोकप्रतिनिधी उमेदवार म्हणून गावात येऊन आश्वासनांची खैरात करतात. या सर्वांसमोर कायम सासकल ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केलेली असताना निवडून आल्यानंतर मात्र या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले जाते. अनेक गावांमध्ये एकेक रस्ता अनेक वेळा डांबरीकरण झाला आहे. नेमकं सासकलच्याच रस्त्यावेळी माशी कुठे शिंकते हाच प्रश्न पडतो.

फलटण-दहिवडी या मुख्य रस्त्यापासून सासकल गावठाणास जाणाऱ्या जोडरस्त्यांवर भाडळी बुद्रुक हद्दीतील गट नंबर १९५, १९२, १९० मध्ये संबंधिताने अडविलेला रस्ता महसूल कोर्टामध्ये वर्षभर केस लढून रस्ता सासकल ग्रामस्थांसाठी खुला करत असल्याचा निकाल सासकल ग्रामस्थांच्या बाजूने दिलेला असतानाही प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कारवाई का केली नाही. याही घटनेला आता जवळजवळ बारा वर्षे उलटली आहेत. ही केस अॅड. रामचंद्र घोरपडे यांनी विनामोबदला लढून सासकल गावासाठी हा रस्ता खुला करून घेतला.

या कामी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पाठपुरावा केला हाेता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा रस्ता खुला करण्यासाठी आंदाेलन करण्यात आले होते.

रस्ता ग्रामस्थांसाठी खुला झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले होते. हा रस्ता बनवत असतानाच या रस्त्याच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान न करता हा रस्ता लवकर पूर्ण व्हावा. तरीही सासकल गावचा रस्ता हा रामभरोसेच राहिला आहे.

सासकल गाव हे फलटण तालुक्यातील छोटे गाव असून चारही बाजूने गावात येण्यासाठी ओढ्यावरूनच यावे लागते. याच ओढ्यावर वेगवेगळ्या निधीतून तीन पूल बांधण्यात आले आहेत. यापैकी दोन पूल हे गेल्या दोन वर्षांपूर्वीच वाहून गेले. त्यावर कोणत्याही प्रकारची पुढील कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामधील एक पूल हा मौजे सासकल येथील वस्तीस जोडणारा होता. या पुलासाठी २६ लाखांचा निधी खर्च करण्यात आला.

चौकट..

निकृष्ट कामामुळे साकव पूल वाहून गेला..

ढिसाळ व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात हा साकव पूल वाहून गेला. हा पूल बांधताना मागासवर्गीय निधीचा गैरवापर झाल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली होती. याच ओढ्यावर या साकव पुलापूर्वी बांधण्यात आलेला साकव पूल म्हणजे सासकल गावठाण ते गिरवी रोड या रस्त्यावरील हा साकव पूल गेल्या वर्षी आलेल्या पावसात वाहून गेला. त्यामुळे हे साकव पूल वाहून गेल्यामुळे संबंधित रस्त्यावरीलच साकव पूल हा ये-जा करण्यासाठी एकमेव मार्ग राहिला असल्यामुळे याच रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.

Web Title: Get the Saskal road work in order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.