एकाच दिवसात मिळतोय गौण खनिज परवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:34+5:302021-07-19T04:24:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोना महामारीच्या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा कामात व नियोजनात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत गौण ...

Getting secondary mineral license in one day! | एकाच दिवसात मिळतोय गौण खनिज परवाना!

एकाच दिवसात मिळतोय गौण खनिज परवाना!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोना महामारीच्या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा कामात व नियोजनात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक व साठा करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाने धडक व कडक पावले उचलत कारवाईचा बडगा उगारला. नुसती कारवाई करण्यापेक्षा रितसर परवाने मिळवण्यासाठीची किचकट प्रक्रिया सोपी करून तहसीलदार किरण जमदाडे यांनी एकाच दिवसात गौण खनिज परवाने देऊन महसुली उत्पन्नात वाढ केली आहे.

अवैद्य उत्खनन आणि वाहतूक केलेल्या बाजारमूल्याच्या पाचपटीपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गौण खनिजाच्या अवैध उत्खननाकरिता वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री व वापरण्यात आलेले जेसीबी साडेसात लाख, डंपर-टिपर दोन लाख, ट्रॅक्टर ट्रॉली एक लाख, पिकअप एक लाख अशी वाहने जप्त करून याप्रमाणे दंडाची तरतूद महसूल विभागाने आयोजली आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना खटाव तालुक्यातील गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक व साठा करणाऱ्या २३ जणांवर जून महिन्यात महसूल प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून ७७ लाखांचा महसूल वसूल केला आहे. दंडात्मक कारवाई ही होतच राहणार मात्र, अवैध गौण खनिज उत्खनन थांबविण्यासाठी खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांनी एक दिशादर्शक भूमिका घेत एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.

अवैध वाहतूक व उत्खननाला आळा घालण्यासाठी एका दिवसात गौण खनिज परवाना देण्याची भूमिका महसूल विभागाच्या उत्पन्नात वाढ निश्चित करत आहे. एकाच दिवसात परवाने मिळत असल्याने जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर यासारख्या वाहनधारकांनी आधी तहसीलदारांचा परवाना काढा, मगच माती-मुरूम आदी वाहून नेण्यास वाहने भाड्याने मिळतील, असे वाहनधारकांकडून स्पष्टपणे सांगितले जात आहे.

यावर्षी मातीचे ६८, मुरमाचे ९२ व डबर ११ असे एकूण १७१ तात्पुरते गौण खनिज व वाहतूक परवाने तातडीने दिल्याने ५० लाखांपेक्षा जास्त स्वामित्वधन महसूल विभागाला प्राप्त झाले. जून या एकाच महिन्यात एकूण ६७ परवाने तातडीने देण्यात आले. शासन परिपत्रकाप्रमाणे तहसीलदारांना पाचशे ब्रासपर्यंत, उपविभागीय अधिकारी यांना दोन हजार ब्रासपर्यंत तर जिल्हाधिकाऱ्यांना पंचवीस हजार ब्रासपर्यंत परवाना देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. खटाव तालुक्यात एका दिवसात गौण खनिज परवाना मिळत असल्याने शेतकरी, लाभधारक व वाहनधारक यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.

---------------------------------------

‌‌ -चौकट-

तात्पुरत्या परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे....

तहसीलदारांच्या नावे साध्या कागदावर हा अर्ज सादर करायचा आहे. तसेच ज्या गटातून उत्खनन करायचे आहे त्याचा सातबारा, जमीन मालकाचे संमतीपत्र व शासन नियमानुसार प्रतिब्रास विहीत केलेले चलन अर्जासोबत असणे क्रमप्राप्त आहे.

---------------------------------------

- चौकट-

स्वामित्वधनाचे दर....

४ जून २०२१च्या महाराष्ट्र शासन राजपत्रितप्रमाणे : चुनखडी ६०० रुपये प्रतिब्रास, दगड ६०० रुपये प्रतिब्रास, मुरूम ६०० रुपये प्रतिब्रास, माती ६०० रुपये प्रतिब्रास व विटा तयार करण्यासाठीची माती २४० रुपये प्रतिब्रास असे स्वामित्वधनाचे दर आहेत.

-------------------------------------

फोटो : वडूज तहसील कार्यालय

-----------------------------------

Web Title: Getting secondary mineral license in one day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.