निढळमधील ५० भाविकांना भगवद् गीता ग्रंथ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:29+5:302021-05-28T04:28:29+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्यात कोरोना संक्रमण अद्यापही आटोक्यात येताना दिसत नाही. येथील कोरोना सेंटर फुल्ल असून, तालुक्यातील कित्येकजण कोरेगाव ...
पुसेगाव : खटाव तालुक्यात कोरोना संक्रमण अद्यापही आटोक्यात येताना दिसत नाही. येथील कोरोना सेंटर फुल्ल असून, तालुक्यातील कित्येकजण कोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णाबरोबरच सर्व कुटुंबीय आजच्या काळात काळजीने ग्रासले आहेत, अशा काळात मनःशांती मिळण्याच्या उद्देशाने निढळ, ता. खटाव येथील पारायण सोहळादरम्यान हरिदत्त सुभाष जाधव यांनी कोरोनाचे नियम पाळत निढळमधील ५० भाविकांना भगवद् गीतेच्या प्रती भेट दिल्या.
निढळचे सुपुत्र व सध्या इन्फोसिस पुणे येथे कार्यरत असलेले हरिदत्त जाधव यांनी भगवद् गीता हा जगातील महान ग्रंथांपैकी एक ग्रंथ सुुमारे ५० जणांना भेेट दिला.
भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत जीवनातील प्रत्येक समस्यांवर समाधान सांगितले आहे. या कोरोनाकाळात मन:शांतीसाठी भगवद् गीतेमध्ये सांगितलेल्या विचारांचे अनुसरण करावे. भगवद् गीता ग्रंथवाचन हा मन:शांती मिळवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. तरी,भगवद् गीता ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.