उपकरणे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:22+5:302021-05-06T04:41:22+5:30
कऱ्हाड : शिरवडे, ता. कऱ्हाड येथील कमलेश रवीढोणे यांच्याकडून ग्रामपंचायतीला दोन थर्मलगन व ऑक्सिमीटर देण्यात आले. यावेळी नडशीचे सरपंच ...
कऱ्हाड : शिरवडे, ता. कऱ्हाड येथील कमलेश रवीढोणे यांच्याकडून ग्रामपंचायतीला दोन थर्मलगन व ऑक्सिमीटर देण्यात आले. यावेळी नडशीचे सरपंच गोविंदराव थोरात, ग्रामसेवक महादेव जाधव, अंगणवाडी सेविका थोरात, प्रताप शिंदे, कोतवाल संजय गुजर, हनुमंत घाडगे उपस्थित होते. कमलेश रवीढोणे हे कऱ्हाड पालिकेत लेखापरीक्षण अधिकारी आहेत. सरपंच गोविंदराव थोरात यांनी त्यांचा सत्कार केला.
रक्तदानास प्रतिसाद
कऱ्हाड : येथील क्रेडाई संस्थेतर्फे रक्तदान शिबिर पार पडले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. क्रेडाईचे अध्यक्ष महेश पाटील, धनाजी जाधव, खजिनदार नितीन काटू, माजी अध्यक्ष राजेंद्र यादव, धनंजय कदम, उपाध्यक्ष मंगेश सुर्वे, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते. शिबिरात ८५ जणांनी रक्तदान केले.
हायमास्टचा झगमगाट
मल्हारपेठ : कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील विहे बसथांब्याचा परिसर हायमास्ट दिव्यांनी उजळून निघाला आहे. उपसरपंच अविनाश पाटील यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. पन्नास मीटर उंचीचे टॉवर उभारून त्यावर हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसर उजळून निघत आहे. सरपंच दिनकर कुंभार, उपसरपंच पाटील यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक जयसिंग पाटील, विजय पळणे यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाले.