Satara: प्रियकराने इमारतीवरुन ढकलून दिल्याने प्रेयसीचा मृत्यू, कराडमधील धक्कादायक घटना
By प्रमोद सुकरे | Published: August 1, 2024 01:54 PM2024-08-01T13:54:19+5:302024-08-01T13:55:03+5:30
कराड : कराड शहरात प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. आरुषी सिंग असे तरुणीचे नाव ...
कराड : कराड शहरात प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. आरुषी सिंग असे तरुणीचे नाव असून तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे.
प्रियकर आणि प्रेयसी कराड (मलकापूर) येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. आरुषी आणि ध्रृव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हा पासून या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. त्या नंतर त्यांनी एकत्रच कराडातील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रृव हा कृष्णा मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डींगमध्ये राहत होता. काल ध्रृवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबध आहेत असे म्हणत ध्रृव आणि आरुषीची यांच्या जोरात वादावादी झाली. त्यानंतर ध्रृवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले. यात तीचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी त्या दोघांच्यात झालेल्या झटापटीत ध्रृवही जखमी झाला आहे. त्याचा पाय मोडल्याचे समजते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री उशीरा या आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री १०३ (१) प्रमाणे ध्रृववर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.