वाठार स्टेशनला रुग्णवाहिका द्या, अन्यथा परिणाम वाईट होतील : आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:54+5:302021-05-28T04:27:54+5:30
आवळे म्हणाले, ‘मोठ्या लोकसंख्येचे गाव तसेच मोठी बाजारपेठ असलेल्या कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र ...
आवळे म्हणाले, ‘मोठ्या लोकसंख्येचे गाव तसेच मोठी बाजारपेठ असलेल्या कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रात सतत गर्दी असते. रस्त्यावर सतत अपघात होत असतात. अशी परिस्थिती असताना दोन वर्षांपूर्वी येथील रुग्णवाहिका पेटली होती. तेव्हापासून या केंद्रास रुग्णवाहिका मिळावी, यासाठी मंत्री आमदार प्रयत्न करत आहेत.’
पंधरा दिवसांपूर्वी वाठार स्टेशनला कोरोना सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळीही या ठिकाणी तत्काळ रुग्णवाहिका देणार, अशी घोषणा झाली. कोरोनासारखी महामारी सुरू असताना जिल्हा आरोग्य विभाग सर्व राजकीय लोकांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. रुग्णवाहिका नसल्याने येथील रुग्ण बाहेर पाठवायचा असेल, तर २० किलोमीटरसाठी चार हजारांची मागणी करत आहे. त्यामुळे आठ दिवसांत रुग्णवाहिका दिली नाही, तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा अमोल आवळे यांनी दिला आहे.