कोरोना लस प्राधान्याने विद्यार्थ्यांना द्या : बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:32+5:302021-01-16T04:43:32+5:30
म्हसवड : कोरोनाची लस प्राधान्याने शालेय विद्यार्थ्यांना देण्याची मागणी कृषीरत्न विश्वंभर बाबर यांनी राज्य शासनाकडे केली आहे. कोरोना महामारीमुळे ...
म्हसवड : कोरोनाची लस प्राधान्याने शालेय विद्यार्थ्यांना देण्याची मागणी कृषीरत्न विश्वंभर बाबर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
कोरोना महामारीमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आयुष्यातील महत्त्वाचे एक वर्ष पूर्णपणे वाया गेलेले आहे. गेल्या फेब्रुवारीपासून सर्व शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालये बंद आहेत. महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्यातील महत्त्वपूर्ण एक वर्ष वाया गेलेले आहे. शिक्षणात विस्कळीतपणा आल्याने अनेकांना वैफल्य सहन करावे लागत आहे. कोरोना भीतीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. काही प्रमाणांत शाळा सुरू केल्या असल्या तरी पालक शिक्षक व संस्थाप्रमुखांवर भीतीचे सावट आहे.
यावर उपाय म्हणून अल्पावधीत सुरू होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्याची मागणी प्रा. बाबर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आले आहे.