ऊस उत्पादकांना किफायतशीर दर देऊ

By admin | Published: October 25, 2015 12:19 AM2015-10-25T00:19:41+5:302015-10-25T00:19:41+5:30

शिवेंद्रसिंहराजे भोसले : अजिंक्यतारा कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभात प्रतिपादन

Give economical rates to sugarcane growers | ऊस उत्पादकांना किफायतशीर दर देऊ

ऊस उत्पादकांना किफायतशीर दर देऊ

Next

 सातारा : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना योग्य व किफायतशीर दर देण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक ती आर्थिक उपाययोजना करण्यात येत आहे,’ असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
शाहूनगर-शेंद्रे येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सन २०१५- १६ या ३२ व्या गळित हंगामाचा अग्निप्रदीपन समारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले, रुद्रनीलराजे भोसले, कारखान्याचे अध्यक्ष रामचंद्र जगदाळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, जितेंद्र सावंत, किशोर ठोकळे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र कदम, पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, सदस्य आनंदराव कणसे, जयवंत कुंभार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आगामी गळित हंगामात गाळपासाठी एकूण ८१११.०७ हे. आर. ऊसक्षेत्राची नोंद झाली असून, या हंगामात सुमारे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. यंदाच्या गळित हंगामाचा शुभारंभ नोहेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले. याप्रसंगी श्री रेणुका शुगर्स लि. चे प्राजेक्ट मॅनेजर बिरादार माजी उपसभापती दादा शेळके, तानाजी तोडकर, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सूर्यकांत धनावडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give economical rates to sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.