गरिबांना जीवनावश्यक वस्तू मोफत द्या : खंडाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:17+5:302021-04-27T04:40:17+5:30
सातारा : हातावर पोट असणाऱ्यांचा केंद्र व राज्य शासनाला विसर पडला आहे. फक्त गहू आणि तांदूळ यावर सर्वसामान्य ...
सातारा : हातावर पोट असणाऱ्यांचा केंद्र व राज्य शासनाला विसर पडला आहे. फक्त गहू आणि तांदूळ यावर सर्वसामान्य जनता कशी काय जगू शकते, हे तर सरकारने सांगावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
गरीब बेरोजगार जनता वर्षभर कशी जगत असेल आणि जगण्यासाठी फक्त गहू आणी तांदूळ येवढेच आवश्यक आहे का त्यासाठी अनेक गोष्टी लागतात की ज्या जीवनासाठी आवश्यक आहेत, त्या विकत घेण्याची पात्रता त्या जनतेकडे आहे किंवा नाही, याचा तर विचार करून कमीत कमी ज्या जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक वस्तू आहेत. खाद्यतेल, डाळी,साखर,साबन, रॉकेल कमी दरात गॅस, सॅनिटायझर या वस्तू शासनाने गरिबांना मोफत द्याव्यात अशी मागणीदेखील खंडाईत यांनी या पत्रकात केली आहे.