एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत

By Admin | Published: October 19, 2015 09:38 PM2015-10-19T21:38:10+5:302015-10-19T23:44:50+5:30

मसूरला शेतकरी मेळावा : शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करणार

Give a lump sum amount according to the FRP: Khot | एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत

एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत

googlenewsNext

मसूर : ‘साखर कारखानदारांनी ऊसदर नियंत्रण अध्यादेशानुसार ‘एफआरपी’च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम द्या; अन्यथा बेकायदेशीररीत्या तुकडे करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, त्यासाठी कसलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.मसूर, ता. कऱ्हाड येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे होते. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक वसंतराव जगदाळे, आत्माराम जाधव, हिंदुराव चव्हाण, तानाजीराव देशमुख, संजूकाका कदम, संदीप इंगवले, रेखा वायदंडे, बजरंग जाधव, संतोष पाटील, दिनकर पाटील, गणेश जाधव, रवींद्र सूर्यवंशी, बाळासाहेब कांबिरे यांची उपस्थिती होती.
खोत म्हणाले, ‘कारखानदारी अडचणीत होती, तेव्हा सहा हजार कोटींचे पॅकेज हे केवळ खा. राजू शेट्टींमुळेच मिळाले, याचे भान कारखान्यांनी ठेवावे. कारखान्यांनी दराचा खरा कायदाच शेतकऱ्यांना कळू दिला नाही. सर्वसामान्य सभेला काय अधिकार आहेत? शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाहीत. सभेत भाडोत्री गुंड व संचालकांचे बगलबच्चे मंजूर-मंजूर म्हणतात. धनदांडग्यांच्या गदारोळात शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो. मूठभर लोकांनी घेतलेला निर्णय सर्वांनी बंधनकारक मानायचा का? मात्र, त्यासाठी सहकार कायदा आहे. आजवरचे दर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनरेट्यामुळेच मिळाले आहेत, त्यासाठी आंदोलने, रास्ता रोकोचा संघर्ष करावा लागला. ऊसदरानंतर मळी, अल्कोहोल, दारू, बगॅससह आदी हिशेबाचे आॅडिटही काढणार आहे. कारखानदारी शासनाशी पडद्यामागे हातमिळवणी करत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
अंजनकुमार घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. विकास पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)


काँग्रेस-राष्ट्रवादी ही सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, अशी टीका करून खोत म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्राने साखर सम्राटाविरोधात कौल देऊन भाजप-सेनेला निवडून दिले, हे राज्य व केंद्र सरकारने विसरू नये त्यांना कारखानदारी हवी की शेतकरी हवा, हे ठरवावे; अन्यथा जनता तुम्हालाही उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर ३४ गुन्हे दाखल आहेत, ते लालदिव्याच्या हव्यासापोटी नाहीत. सामान्य शेतकरी हाच माझा लालदिवा आहे.
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व एफआरपीची एकरकमी रक्कम मिळण्यासाठी या जनहिताच्या आंदोलनात सर्वांनी राजकारण गट,तट न पाहता साखरसम्राटांना ताळ्यावर आणण्यासाठी २६ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वांनी सहभागी व्हावे. - मनोज घोरपडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Give a lump sum amount according to the FRP: Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.