रीडिंगप्रमाणेच नागरिकांना पाणी बिले द्या -सीता हादगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:50+5:302021-05-18T04:40:50+5:30

सातारा : रीडिंग न घेताच जीवन प्राधिकरणकडून नागरिकांना पाण्याची बिले दिली जात आहे. बिलाची रक्कम अवाच्या सव्वा असल्याने नागरिकांमधून ...

Give water bills to the citizens as per the reading - Sita Hadage | रीडिंगप्रमाणेच नागरिकांना पाणी बिले द्या -सीता हादगे

रीडिंगप्रमाणेच नागरिकांना पाणी बिले द्या -सीता हादगे

googlenewsNext

सातारा : रीडिंग न घेताच जीवन प्राधिकरणकडून नागरिकांना पाण्याची बिले दिली जात आहे. बिलाची रक्कम अवाच्या सव्वा असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने मीटरप्रमाणेच नागरिकांना दिले द्यावीत, अशी मागणी सातारा पालिकेचा पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केली आहे.

याबाबत जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अभियंता पल्लवी मोठे यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहराच्या काही भागाला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून तर उपनगरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणात येणाऱ्या ग्राहकांना मीटरचे रीडिंग न घेताच अवाच्या सव्वा बिले पाठवली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातारकर जनतेत जीवन प्राधिकरण याच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे. याबाबत सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे काही लेखी व तोंडी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सध्या नागरिक अनेक अडचणींमधून जात असताना अवाच्या सव्वा बिले आकारून त्यांची पिळवणूक करणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. महाराष्ट्र शासनाला महसूल मिळाला पाहिजेच. मात्र, तो महसूल मिळवून देताना त्यामध्ये पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. सातारावासीयांना पाणी बिले आकारली पाहिजेत. मात्र, ती आकारत असताना पाण्याच्या रीडिंगचा नेमकेपणाने वापर होणे गरजेचे आहे. विनाकारण सातारकरांना जास्तीची पाणी बिले आकारून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड न देता, त्यांनी वापरलेल्या पाण्या एवढीच बिले त्यांना आकारण्यात यावी, मीटर रीडिंगसाठी जिओटॅग असलेला फोटो घेऊनच आकारणी करावी, म्हणजे नागरिक व जीवन प्राधिकरणमध्ये पारदर्शकता दिसून येईल, अन्यथा सातारकरांसाठी प्रसंगी आम्ही कडक धोरणांचा अवलंब करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Web Title: Give water bills to the citizens as per the reading - Sita Hadage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.