गोवा बनावटीचा २० लाखांचा मद्यसाठा कराडात पकडला, दोघे ताब्यात

By प्रमोद सुकरे | Published: July 22, 2023 03:24 PM2023-07-22T15:24:54+5:302023-07-22T15:25:12+5:30

कराड : सातारा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अमली पदार्थ तसेच बनावटीचा मद्यसाठा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात ...

Goa made liquor worth 20 lakhs caught in Karad, two detained | गोवा बनावटीचा २० लाखांचा मद्यसाठा कराडात पकडला, दोघे ताब्यात

गोवा बनावटीचा २० लाखांचा मद्यसाठा कराडात पकडला, दोघे ताब्यात

googlenewsNext

कराड : सातारा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अमली पदार्थ तसेच बनावटीचा मद्यसाठा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान कराड येथील उत्पादन शुल्क विभागाने कराड हद्दीत गोवा बनावटीचा तब्बल २० लाखांचा मद्यसाठा पकडला आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक  किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली कराड या कार्यक्षेत्रात शुक्रवार दि. २१ रोजी नांदलापूर (ता. कराड)  गावच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवरून अवैद्य मद्याची वाहतुक करत असताना एक संशयीत महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक ९MH-१७-BY-९४३७) निदर्शनास आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे एकूण ११० बॉक्स म्हणजेच ७५० मिली क्षमतेच्या १ हजार ३२० सिलबंद बाटल्या मिळून आल्या. 

हे चारचाकी वाहन तसेच दोन मोबाईल संच असा एकूण १७ लाख ३७ हजार किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हामध्ये अजय वसंत कुळधरण (वय २८) व साहिल रामदास धात्रक (वय २०, दोघे रा. पिंपरी लोकें ता. राहाटा जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) (अ),८०,८३,९०,९८,१०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक व्ही. बी. शिंदे, दुय्यम निरीक्षक पी.व्ही.नागरगोजे, सहाय्यक निरीक्षक पी. आर. गायकवाड, व्ही .व्ही. बनसोडे, यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्यातील तपास राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे दुय्यम निरीक्षक व्ही. बी. शिंदे हे करत आहेत.

Web Title: Goa made liquor worth 20 lakhs caught in Karad, two detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.