उपासमार टळली कारण : माणसातले देव आले भुकेलेल्यांच्या मदतीला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:37 AM2020-04-30T11:37:41+5:302020-04-30T11:39:51+5:30
देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे.
सातारा : कोरोना विषाणूने थैमान घातल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हाताला काम नसल्याने हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, अशा लोकांना मदत करण्यासाठी काही ह्यमाणसातले देवह्ण अशा उपेक्षित आणि गरजू लोकांसाठी पुढे सरसावले असून, ते लॉकडाऊन झाल्यापासून दररोज अन्नधान्य व जेवणाच्या पॅकेटचे वाटप करत आहेत.
देशात व महाराष्ट्रामध्ये कोरोनो विषाणूमुळे मोठे संकट आले आहे. लॉकडाऊन केल्यापासून आपल्या देशातील गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. जिल्हाबंदी आदेश लागू झाल्यानंतर अडकलेल्या प्रत्येकालाच स्वत:च्या घराची ओढ लागली आहे. अनेकांनी मिळेल त्या वाहनाने आपले गाव आणि घर गाठण्यास सुरुवात केली. काही तर शेकडो मैल अंतर पायी चालून आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने अशा लोकांना त्याच ठिकाणी थांबवून त्यांच्यासाठी जेवणाची आणि निवासाची सोय केली.
मात्र, आजही हजारो लोक रस्त्यावर आणि आपल्या घरात आहेत; पण त्यांच्या हाताला बरेच दिवस काम नाही. होते नव्हते ते धान्य आणि पैसे खर्च झाल्यानंतर आता खाण्यासाठी काहीच नाही. अशा लोकांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामध्ये विशेषत: उपेक्षित, गरीब, आजारी व्यक्ती, वृद्ध, दिव्यांगांचा समावेश आहे.