गोडोलीत प्राध्यापकाचा फ्लॅट फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:29+5:302021-04-17T04:38:29+5:30
सातारा : येथील गोडोली परिसरातील जगतापवाडी येथील एक प्राध्यापकाच्या घरातून ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. चोरीला गेलेल्या ऐवजांमध्ये ...
सातारा : येथील गोडोली परिसरातील जगतापवाडी येथील एक प्राध्यापकाच्या घरातून ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. चोरीला गेलेल्या ऐवजांमध्ये सोने, चांदीचे दागिने, पुस्तके, आदींचा समावेश आहे. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास बसवेश्वर कुंभार (वय २८, रा. साई अपार्मेंट, जगतापवाडी, गोडोली, सातारा. मूळ रा. टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) हे प्राध्यापक आहेत. गुरुवारी (दि. १५)मध्यरात्री दीड ते पहाटे साडेपाच या वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बेडरूमच्या भिंतीला शिडी लावून बेडरूमच्या काचेच्या स्लाईडिंगच्या अर्धवट दरवाजातून आत प्रवेश केला. बेडरूमच्या दरवाजाची कडी आतून उघडून हॉलमध्ये प्रवेश केला. यानंतर हॉलच्या दरवाजाची आतील कडी काढून हॉलमध्ये असणारी १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, दोन हजारांच्या चांदीच्या चार अंगठ्या, १० हजार रुपयांचा मोबाईल, एक हजार रुपयांचा चार्जर, पाच हजारांचा पेन, पुस्तके गाडीची कागदपत्रे, ५०० रुपयांची बॅग असा ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक एल. व्ही. दगडे हे करीत आहेत.