भाजी मंडईत जाताय; मोबाईल सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:33+5:302021-07-04T04:26:33+5:30

सातारा : शहरात सध्या लाॅकडाऊनसदृश परिस्थिती असल्यामुळे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. मात्र, इतर वेळी शहरात कमीत ...

Goes to the vegetable market; Handle mobile | भाजी मंडईत जाताय; मोबाईल सांभाळा

भाजी मंडईत जाताय; मोबाईल सांभाळा

Next

सातारा : शहरात सध्या लाॅकडाऊनसदृश परिस्थिती असल्यामुळे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. मात्र, इतर वेळी शहरात कमीत कमी मोबाईल चोरीच्या दोन तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. यातील सर्व तक्रारी या भाजी मंडईतील होत्या.

सातारा शहरामध्ये तीन वर्षांपूर्वी मोबाईल चोरणारी टोळी कार्यरत होती. बसस्थानकाशेजारी असलेल्या भाजी मंडईमध्ये विशेषत: मोबाईल चोरीचे प्रकार घडत होते. सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने या टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीने तब्बल ४० हून अधिक मोबाईल जप्त केले होते. मात्र, काही दिवसांतच पुन्हा शहरात मोबाईल चोरीस जाऊ लागले. ते आजतागायत सुरूच आहे. गत वर्षी लाॅकडाऊन पूर्वी बसस्थानकासमोरील भाजी मंडईमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. शहर पोलीस ठाण्यात रोज पाचहून अधिक तक्रारी दाखल होत होत्या. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे भाजी मंडई पूर्वीसारखी भरत नाही. तरीसुद्धा मोबाईल चोरीच्या दिवसाला दोन तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. मात्र, मोबाईल चोरीस गेल्यानंतर अनेकजण तक्रार देत नाहीत. पुन्हा मोबाईल सापडणार नाही, अशी प्रत्येकाची धारणा होते. त्यामुळे बरेचजण तक्रार देत नाहीत. एखाद्या गुन्ह्यात जर हरविलेल्या मोबाईलचा वापर झाला तर मग ज्यांनी तक्रार दिली नाही त्यांच्यावर बालंट येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला मोबाईल हरविल्यास पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार देणे गरजेचे आहे. सध्या मात्र, तक्रारींचा ओघ कमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही

अनेकदा घरातून अथवा मंडईतून मोबाईल चोरीस गेल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाते. मात्र, चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लागत नाही. त्यामुळे अनेकजण पोलीस ठाण्यात तक्रारच देत नाहीत. तसं पाहिलं तर पोलिसांनी मनावर घेतले तर जेवढे मोबाईल चोरीस गेले तेवढे मोबाईल सापडू शकतात. एखादा मोठा गुन्हा घडल्यानंतर पोलीस लोकेशनद्वारे मोबाईलचा शोध घेतात. खून करून एखादा पसार झाला असेल तर त्याच्या मोबाईलचे लोकेशन पाहून त्याला पकडले जाते. मात्र, इथे पोलीस तत्परता दाखवत नाहीत.

मोबाईल तपास लागण्याचे प्रमाण किती?

चोरीचे मोबाईल सापडण्याचे प्रमाण केवळ २ टक्के आहे. घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकरणामध्ये मोबाईल पोलिसांना सापडतात. कारण हा गुन्हा अत्यंत गंभीर असतो. त्यामुळे पोलीस या गुन्ह्यांचा शोध घेत असतानाच आरोपींसोबत मोबाईलही जप्त केला जातो. भाजी मंडईत अथवा एसटीमध्ये चढताना जर मोबाईल चोरीस गेला तर त्या मोबाईलचा तपास पोलीस तत्परतेने करत नाहीत. तपासाला वेळ नसल्याचे कारण सांगून पोलीस तपासाला टाळाटाळ करतात.

मोबाईल चोरीस जाताच हे करा

मोबाईल चोरीस गेल्यास अनेकदा काय करावे, हे बऱ्याच जणांना सुचत नाही. मात्र, घाईगडबड न करता मोबाईलमधील कार्ड ब्लाॅक करणे गरजेचे आहे. तसेच तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी. अनेकदा पोलीस तक्रार दाखल करताना मोबाईलची पावती मागतात. मात्र, त्यावेळी त्यांना पावती द्या. तक्रारीची पोहोच तुमच्याजवळ ठेवा. अधूनमधून पोलिसांना तपासाबाबत विचारणा करा.

मोबाईल चोरीस गेल्यानंतर प्रथमत: संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात यावे. मोबाईल कुठे चोरीस गेला याची माहिती पोलिसांना द्यावी. त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास लावतात. मात्र, बऱ्याचदा मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांना तपास करताना मोठ्या अडचणी ठरत असतात. परिणामी तपासाला दिरंगाई होते. नागरिकांनीही आपल्या मोबाईलची काळजी घेतली पाहिजे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले पाकीट, मोबाईल सांभाळून ठेवला पाहिजे.

- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक

Web Title: Goes to the vegetable market; Handle mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.