साताऱ्यात चौकाचौकात जिलेबीची दुकाने, प्रजासत्ताक दिन, परस्परांना जिलेबी देऊन साजरा करतात आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:11 PM2018-01-25T14:11:48+5:302018-01-25T14:23:09+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरात अनेक मिठाईच्या दुकानांसमोर मंडप सजले आहेत. यंदाही चौका चौकात छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी जिलेबीची दुकाने थाटली आहे. जिलेबी तयार करण्याची आणि पीठ भिजत घालण्यासाठी सुमारे एक महिना आधीपासून तयारी सुरू करण्यात येते. यंदाही टनभर जिलेबीची तयारी व्यापाऱ्यांनी सातारकरांसाठी केली आहे.
ठळक मुद्देसाताऱ्यात चौकाचौकात जिलेबीची दुकानेप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंडप सजले परस्परांना जिलेबी देऊन साजरा करतात आनंद
सातारा : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरात अनेक मिठाईच्या दुकानांसमोर मंडप सजले आहेत. यंदाही चौका चौकात छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी जिलेबीची दुकाने थाटली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साताऱ्यांतील मिठाई व्यावसायिकांनी आनंद साजरा करण्यासाठी जिलेबी वाटली होती. त्यानंतर अखंडितपणे सातारकर प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने परस्परांना जिलेबी वाटून हा आनंद साजरा करतात.
जिलेबी तयार करण्याची आणि पीठ भिजत घालण्यासाठी सुमारे एक महिना आधीपासून तयारी सुरू करण्यात येते. यंदाही टनभर जिलेबीची तयारी व्यापाऱ्यांनी सातारकरांसाठी केली आहे.