गोंदवलेच्या वनराईला आता ठाण्याच्या इंजिनाने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:55+5:302021-01-02T04:55:55+5:30

सातारा : गोंदवले खुर्द येथील भावंडांनी पर्यावरण रक्षणासाठी डोक्यावरून पाणी नेऊन वनराई फुलविली. झाडं मोठी झाल्याने त्यांना डोक्यावरून पाणी ...

The Gondwale forest is now watered by the Thane engine | गोंदवलेच्या वनराईला आता ठाण्याच्या इंजिनाने पाणी

गोंदवलेच्या वनराईला आता ठाण्याच्या इंजिनाने पाणी

Next

सातारा : गोंदवले खुर्द येथील भावंडांनी पर्यावरण रक्षणासाठी डोक्यावरून पाणी नेऊन वनराई फुलविली. झाडं मोठी झाल्याने त्यांना डोक्यावरून पाणी नेलेलं पुरेना, याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे येथील श्री स्वामी समर्थ ट्रस्टचे महेश कदम यांनी या भावंडांना तब्बल ५१ हजार रुपयांची डिझेल इंजिन, पाईप देऊन नववर्षाची भेट दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, गोंदवले खुर्दची भावंडे रोहित बनसोडे व रक्षिता बनसोडे ही गेल्या तीन वर्षांपासून आखंडितपणे माणदेशी दुष्काळी भागात पर्यावरण रक्षणासाठी झुंज देत आहेत. बोडक्या माळरानावर त्यांनी हाजारो झाडांची वनराई साकारली आहे. झाडे लहान असताना डोक्यावर पाणी वाहून ती जगविली; पण आता झाडे भरपूर प्रमाणात लावल्याने त्यांना पाणी घालने कठीण जात होते. ताकदीच्या आवाक्याबाहेर पाणी घातले जात होते. ही बाब लेखक अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून महेश कदम यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी डिझेल इंजिन आणि पाईपलाईन घेण्यासाठी ही यंत्रसामग्री देऊन रोहित, रक्षिताला अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.

चौकट :

गोंदवले येथील रोहित आणि रक्षिता या भावंडांनी केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी महेश कदम यांनी नववर्षाचा मुहूर्त साधला. दोघांनी कष्टाने उभ्या केलेल्या वनराईत वेळ व्यतीत केल्यानंतर त्यांनी या दोघांनाही कायमस्वरूपी मदत करण्याचे आश्वासन दिले. वनराई फुलविण्याचं या दोन्ही भावंडांचं काम इतरांसाठी मार्गदर्शक आणि अनुकरणीय असल्याने याचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार करण्यात येईल, असं कदम म्हणाले.

कोट :

माणदेशी मातीसाठी इथल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही झाडे लावून जगवत होतो. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही ज्या यातना कळा सोसल्या त्या कदम यांच्या दार्तृत्वाने भरून पावलं आहे. भविष्यातही हिरवाई स्वप्न निरंतर ठेवू.

- रक्षिता बनसोडे, गोंदवले

फोटो आहे

Web Title: The Gondwale forest is now watered by the Thane engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.