वणवामुक्त अजिंक्यताऱ्याचा साताऱ्यात निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 12:47 PM2020-01-02T12:47:09+5:302020-01-02T12:56:08+5:30

वृक्षारोपण व संवर्धनाबरोबर संरक्षण ही गरजेची गोष्ट आहे.

good decision for save environment ajinkyatara satara | वणवामुक्त अजिंक्यताऱ्याचा साताऱ्यात निर्धार

वणवामुक्त अजिंक्यताऱ्याचा साताऱ्यात निर्धार

Next

प्रगती जाधव-पाटील

सातारा - वृक्षारोपण व संवर्धनाबरोबर संरक्षण ही गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे सर्व शक्तिनिशी वणवा लावणाऱ्यांशी मुकाबला करुन अजिंक्यताऱ्याचे नाव सार्थकी लावू असा निर्धार मंगळाई देवीच्या साक्षीने अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारकरांनी केला.

‘लोकमत’च्या पुढाकारातून व सातारा वनविभागाच्या सहकार्याने वनवामुक्तीच्या अभियानाचा प्रारंभ नववर्षाच्या पहिल्या सुर्यकिरणांच्या साक्षीने शाहूनगरमध्ये झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, कन्हैयालाल राजपुरोहित, ढाणेज क्लासेसचे प्रा. विशाल ढाणे, हरिओम ग्रुपचे आप्पा कोरे, रानवाटा पर्यावरण मंडळाचे विशाल देशपांडे, ड्रोंगो संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे, शाहूपुरी माध्यमिक विद्यालयालयाचे संस्थापक भारत भोसले, अमोल कोडक, जयश्री शेलार, चित्रा भिसे, पंकज नागोरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख दिपक शिंदे यांनी केले.

वणवे लावल्यामुळे दरवर्षी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. आपण रहात असलेल्या शहराचे पर्यावरण चांगले राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकजण वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासाठी काम करत असतो. मात्र एखाद्या माथेफिरुच्या आसुरी आनंदासाठी टाकली गेलेली काडी या साºया प्रयत्नांवर पाणी फिरवते. शिवाय लहानमोठ्या जीवजंतूंची राखरांगोळी होते.हे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी ‘लोकमत’ने वनवामुक्ती अभियान हाती घेतले आहे. त्याचा प्रारंभ शाहूनगरमध्ये, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी झाला. सर्वांनी एकीचे बळ दाखवत अजिंक्यतारा किल्ला वनवामुक्त ठेवण्याचा निर्धार यावेळी केला.

अजिंक्यतारा किल्ला परिसरात वनविभाग जाळरेषा काढणार आहे. त्याकरिता लोकसहभाग म्हणून रोज २ तास श्रमदान करण्याचे ठरले. या नागरिकांना आवश्यक पाठबळ व तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन करण्याचे आश्वासन डॉ. हाडा यांनी दिले. ‘वणवा लागू नये यासाठी ‘लोकमत’ने सामाजिक जबाबदारीतून एक चांगले पाऊल उचलले आहे. या प्रयत्नांना नागरिकांनी लोकसहभाग नोंदवून प्रतिसाद द्यावा’ अदे आवाहन रामचंद्र शिंदे यांनी यावेळी केले.  

वनकर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक

वणवा दक्षता/प्रतिबंधक पथकातील वनपाल सुहास भोसले, वनरक्षक प्रशांतकुमार पडवळ, राजकुमार मोसलगी, वनमजुर गोरख शिडतुरे, अभिषेक जाधव यांनी ग्रास कटर, ब्लोअरचा वापर करून जाळरेषा कशी काढतात याचे प्रात्यक्षीक दाखवले. अत्यंत प्रतिकूल व अडचणीच्या  परिस्थितीत वनकर्मचारी करत असलेले काम पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक करत याकामी लोकसहभागातून योगदान देण्याची ग्वाही दिली.

सहभागासाठी लोकमतचे आवाहन

वनवा मुक्तीचा हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत १० नागरिकांचा एक ग्रुप जाळरेषा काढण्यासाठी श्रमदान करेल. वनकर्मचारी याकामी सहकार्य करणार आहेत. किमान १० नागरिकांच्या गटाने पर्यावरण रक्षणासाठी यात योगदान द्यावे. अधिक माहिती व नियोजनासाठी पत्रकार प्रगती जाधव पाटील ८७८८१३९९५४ येथे संपर्क साधावा.

पाण्याच्या बाटल्यांची आवश्यकता

जाळरेषा काढण्यासाठी मर्यादित  गवत पेटवावे लागते. त्यानंतर विशिष्ट अंतरावर आग पसरल्यानंतर ती ब्लोअरने विजविण्यात येते. हे काम करताना वन कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झळा बसतात. त्यामुळे शरिरातील पाण्याची पातळी कमी होते. पाण्याची ही पातळी वाढविण्यासाठी त्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध होणं आवश्यक आहे. ज्या सातारकरांना शारिरीक हालचाली करण्यास मर्यादा आहेत, त्यांनी जाळरेषा काढणाºयांसाठी घरून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आनण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: good decision for save environment ajinkyatara satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.