साताºयात गुड फ्रायडेनिमित्त संदेश फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:56 AM2019-04-20T11:56:12+5:302019-04-20T11:56:45+5:30
शहरात गुडफ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रार्थना केली. येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात शब्दांवर संदेश देण्यात आला. तसेच सातारा शहरातून संदेश फेरी
सातारा : शहरात गुडफ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रार्थना केली. येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात शब्दांवर संदेश देण्यात आला. तसेच सातारा शहरातून संदेश फेरी काढण्यात आली.
सकाळी दहा ते बारा या वेळेत सातारा शहरातून गुड फ्रायडेनिमित्त शांतीचा संदेश देणारी फेरी काढण्यात आली. गुडफ्रायडेचा शुक्रवार म्हणजे सत्याचा असत्यावर विजय मानला जातो. लोकांच्या पाप क्षमेसाठी स्वत:चे बलिदान क्रूस खांबावर देऊन जगाला एक संदेश येशू ख्रिस्तांनी दिला. त्यामुळे या दिवसाला उत्तम शुक्रवार (गुड फ्रायडे ) म्हणून संबोधले जाते. गुडफ्रायडेच्या आधी चाळीस दिवस ख्रिस्ती बांधव उपवास करतात. गुड फ्रायडेनिमित्त साताºयातील टिळक मेमोरिअल चर्च येथे ख्र्रिस्ती बांधवांनी एकत्र येऊन प्रार्थना केली.