निखळ मैत्री अन् बरंच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:21+5:302021-07-18T04:27:21+5:30

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ...

Good friendship and much more! | निखळ मैत्री अन् बरंच काही !

निखळ मैत्री अन् बरंच काही !

Next

सातारा जिल्ह्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे फारसे वारे आलेले नसले तरी याबद्दल प्रत्येकालाच कमालीची उत्सुकता असते. लग्न करण्यापूर्वी एकमेकांना पुरेसे ओळखता यावे, स्वभाव समजावेत म्हणून शहरी भागात तरुण-तरुणी एकत्र राहतात. या काळात त्यांच्यात कसले नातेसंबंध असतील, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्यावर ‘निखळ मैत्री आणि बरंच काही’ हे योग्य उत्तर असू शकते.

नवी पिढी जरा जास्तच व्यवहारी आहे. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे त्याला आपण नीट ओळखले पाहिजे, पारखले पाहिजे, हा विचार नव्या पिढीत रुजत आहे. त्यामुळेच लग्नापूर्वी तरुण-तरुणी एकत्र राहतात. या संबंधांकडे ते केवळ निखळ मैत्री म्हणूनच पाहत आहेत. या काळात दोघेही होणारा नवरा किंवा बायको म्हणून न राहता मित्र-मैत्रीण म्हणूनच राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकमेकांची काळजी घेतली जाते, कोणी आजारी पडले तर काळजी घेतले जाते. त्याची सेवा केली जाते. अनेकदा रात्री जागून काढल्या जातात. तसेच होणाऱ्या जोडीदाराला काय आवडतं, काय आवडत नाही, हे पाहिले जाते. साहजिकच कालांतराने आवडी-निवडी जपल्या जातात. या काळात कसल्याही नात्याचं दडपण नसल्याने हसणं, खेळणं चाललेलं असतं. हे तटस्थपणे पाहणाऱ्यांना छान-छान वाटत असले तरी या नात्यामध्ये अनेक अडचणी जाणवत असतात.

चौकट :

गाजराची पुंगी वाजली तर वाजली

‘लिव्ह इन रिलेशन’ म्हणजे एकप्रकारे व्यवहारच असतो. एकमेकांचे स्वभाव, मन जुळले तर त्याचा शेवट गोड होतो. लग्न लावून ते संसाराला लागतात. पण त्यांच्यात नाहीच काही जुळले तर दोघेही एकमेकांना सोडून आपापल्या मार्गाने निघून जातात.

चौकट :

व्यवहार आडवा येतो अन्...

‘लिव्ह इन रिलेशन’ हे एकमेकांना ओळखण्यासाठी एक नाव असले तरी अनेकदा दोघांमधील एक व्यवहार असतो. पुणे, मुंबईतील फ्लॅटचे भाडे परवडत नाही. अशावेळी आपापल्या गावाकडील तो किंवा ती एक खोली भाड्याने घेऊन राहतात. चहा, नाष्ट्याचा खर्च विभागला जातो. त्यामुळे हे म्हणजे केवळ व्यावहारिक तडजोड समजली जाते; पण त्यातील एखादा दुसऱ्यानेच खर्च करावा म्हणून भाग पाडतो. सुरुवातीला काहीवेळा मैत्रीच्या नात्यात तो केला जातोही, पण वारंवार घडत असल्यास किंवा मुद्दाम गंडवले जात असल्याचे लक्षात आल्यावर सर्व सोडून दिले जाते. पण त्यानंतर मनाला त्रास झाल्यास ते निघून जातात.

Web Title: Good friendship and much more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.