चांगले रस्ते विकासाचे प्रतीक : जिजामाला नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:26 AM2021-07-16T04:26:49+5:302021-07-16T04:26:49+5:30
मलटण : ‘चांगले रस्ते असणे हे विकासाचे प्रतीक आहे. तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. फलटण ते ...
मलटण : ‘चांगले रस्ते असणे हे विकासाचे प्रतीक आहे. तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. फलटण ते पुणे रेल्वे सुरू करून या भागातील औद्योगिकरण व युवकांना रोजगार उपलब्ध होईल,’ असे मत जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सुरवडी येथे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सुरवडी रेल्वेलाईन शेजारील गावामध्ये जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी रेल्वेचे सातारा विभागाचे अधिकारी ओशपाल सिंह यादव, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील, उपसरपंच दीपक साळुंखे-पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते अभिजित नाईक-निंबाळकर, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, सिराज शेख, युवा नेते अमित रणवरे व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निंभोरे गावचे माजी सरपंच शिवाजीराव जाधव, सुधीर कराळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.