साताऱ्यातील गुंड पिल्या नलवडे स्थानबध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:43+5:302021-08-21T04:44:43+5:30
सातारा : शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुंड पिल्या उर्फ विजय राजू नलवडे याला जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. ...
सातारा : शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुंड पिल्या उर्फ विजय राजू नलवडे याला जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. शांततेस बाधा निर्माण होणारी कृत्ये होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या पिल्या उर्फ विजय नलवडे (वय ३०, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरोधात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तयार केला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
दरोडा, जबरी चोरी, खंडणी, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत, गंंभीर दुखापत, धाक दाखविणे, घरी जाऊन मारहाण करणे आदी प्रकारचे गुन्हे पिल्याने केले आहेत. त्यामुळे त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होणारी कृत्ये होत असल्याने व धोकादायक व्यक्ती झाल्याची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पिल्या नलवडेला स्थानबध्द करण्याचा आदेश काढला. त्यानुसार १९ ऑगस्टपासून पिल्याला सातारा जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
चौकट :
स्थानबध्दतेची तिसरी कारवाई...
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी साताऱ्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये तीन जणांवर स्थानबध्दतेची कारवाई केली आहे, तर १० टोळ्यातील ५८ जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई झाली. तसेच १० टोळ्यांतील ४१ जणांवर तडीपारीची कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.
..............
फोटो दि.२०सातारा गुंड पिल्या नलवडे फोटो...
.................................................