गोपूज ग्रामस्थांचे एक पाऊल पुढे : संदीप मांडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:43+5:302021-05-13T04:39:43+5:30
औंध : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. इतर गावांच्या तुलनेत गोपूजमध्ये रुग्णसंख्या अत्यल्प प्रमाणात असूनदेखील ...
औंध : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. इतर गावांच्या तुलनेत गोपूजमध्ये रुग्णसंख्या अत्यल्प प्रमाणात असूनदेखील पूर्वतयारी म्हणून विलगीकरण कक्षाची उभारणी केली असल्याने कोरोनाच्या लढाईत ग्रामस्थांचे एक पाऊल पुढे आहे,’ असे मत माजी सभापती संदीप मांडवे यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत गोपूज व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सुरू केलेल्या विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच संतोष कमाने, ग्रामसेवक सुनील राजगुरू, संभाजी घार्गे, पृथ्वीराज घार्गे, संजय चव्हाण, उमेश घार्गे, रणजित चव्हाण, मुख्याध्यापक दिलीप जाधव, डॉ. पडळकर, आसावरी खराडे, मयुरी मोरे, नारायण चव्हाण, बाळू घार्गे, हर्षद घार्गे, मंगेश घार्गे, अनिल मदने आदी उपस्थित होते.
विक्रमशील कदम म्हणाले, ‘कोणतेही बारीक-सारीक दुखणे अंगावर काढू नका. वेळीच उपचार घेतले की कोरोना बरा होतो, आपल्या विलगीकरण कक्षास कोणतीही मदत करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी वर्धन कारखान्याच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, वाफारा मशीनचे वाटप करण्यात आले. उपसरपंच संतोष कमाने यांनी आभार मानले.