गोपूजचा भैरवनाथ यात्रोत्सव साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:07+5:302021-05-04T04:18:07+5:30
औंध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपूज येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथाची यात्रा साधेपणाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोजक्याच ...
औंध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपूज येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथाची यात्रा साधेपणाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोजक्याच पौरोहित्य व पुजारी बंधूंच्या उपस्थितीत केवळ धार्मिक होणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गोपूज येथे सामाजिक अंतर ठेवून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पडलेल्या बैठकीत सरपंच सरिता घार्गे, तलाठी उत्तम चव्हाण, ग्रामसेवक सुनील राजगुरू, सदस्य धनाजी पाटील, उमा घार्गे, मनीषा जाधव, नीलम घार्गे, मंगल घार्गे, सुरेखा कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामसेवक राजगुरू म्हणाले, ‘गतवर्षीही कोरोनाचे संकट होते. त्यामुळे यात्रा साधेपणाने करण्यात आली होती. यंदाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात कोरोनाचा संसर्ग असल्याने ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा न भरवता केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. त्यामुळे दि. ५ रोजी हळदी, दि. ६ रोजी देवाची लग्न व दि.७ रोजी मुख्य दिवस या तिन्ही दिवशी कोणीही येऊ नये, भाविकांनी घरूनच नामस्मरण, नमस्कार करावा, तसेच यात्रेला गावात पै-पाहुणे व मित्रमंडळींना कोणीही बोलवू नये, या दिवशी बंदोबस्तासाठी पोलीस स्टेशनला पत्रही दिले आहे. यावेळी शशिकांत कुलकर्णी, चंद्रकांत घार्गे, जयंत घार्गे, सत्यवान कमाने, कृष्णत जाधव, बाळासाहेब चव्हाण हे उपस्थित होते.
०३औंध
फोटो : गोपूज येथे भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. यामध्ये यात्रा साध्या पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (छाया : रशिद शेख)