गोसावेवाडीत भावाचा विहिरीत ढकलून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:53 PM2019-02-19T22:53:02+5:302019-02-19T22:53:07+5:30

कºहाड/मसूर : गोसावेवाडी (ता. कºहाड) येथून गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी एका विहिरीत आढळून ...

In Gosavewadi, the brother's blood was thrown in the well | गोसावेवाडीत भावाचा विहिरीत ढकलून खून

गोसावेवाडीत भावाचा विहिरीत ढकलून खून

Next

कºहाड/मसूर : गोसावेवाडी (ता. कºहाड) येथून गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी एका विहिरीत आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुलाच्या चुलत भावालाच अटक केली असून, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावेवाडी येथे तानाजी बनसोडे हे पत्नी शैला व तीन अपत्यांसह राहण्यास आहेत. बनसोडे यांचा अकरा वर्षांचा तेजस हा मुलगा माळवाडी येथील मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी (दि. १२) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मदर तेरेसा स्कूलची बस गोसावेवाडी येथे आली. तेजस व त्याची मोठी बहीण विजया हे दोघेजण त्या बसमधून शाळेला गेले. आई-वडील संध्याकाळी घरात आल्यानंतर घरात वैशाली व विजया या दोन मुली होत्या. तानाजी यांनी तेजसबाबत विचारणा केली असता त्याला त्याचा चुलत भाऊ समाधान याने दुपारी जेवायला त्याच्या घरी नेले होते, असे मुलींनी तानाजी यांना सांगितले. त्यामुळे तानाजी हे समाधानकडे तेजसबाबत विचारणा करायला गेले. मात्र, तेजस जेवण करून दुपारीच निघून गेल्याचे व मी शेतात गेलो होतो, असे समाधानने सांगितले.
तेजस बेपत्ता झाल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी याबाबतची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेपत्ता तेजसचा शोध सुरू केला.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी विहिरीत तेजसचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. पोलीसही तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कºहाडला पाठवून दिला.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हा खून मृत तेजसचा चुलत भाऊ समाधान निवास बनसोडे याने केल्याचे उघडकीस येत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा समाधान बनसोडे याला अटक करण्यात आली आहे.
मधाचं पोळं काढण्याचा बहाणा!
तेजस शाळेतून दुपारी घरी आल्यानंतर चुलत भाऊ समाधानने हाक मारून त्याला बोलावून घेतले. ‘रानातून मधाचं पोळं काढायचं आहे. मध खायला देतो,’ असे सांगून त्याने तेजसला शिवारातील पडक्या विहिरीकडे नेले आणि विहिरीत ढकलून देऊन त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सांगितले.

Web Title: In Gosavewadi, the brother's blood was thrown in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.