शासकीय महाविद्यालयात रॅगिंग!
By admin | Published: April 10, 2017 03:51 AM2017-04-10T03:51:14+5:302017-04-10T03:51:14+5:30
येथील एका शासकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघड झाला असून, वरिष्ठ विभागातील
कऱ्हाड : येथील एका शासकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघड झाला असून, वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार शनिवारी रात्री प्राचार्यांकडे करण्यात आली आहे.
रॅगिंगचा सामना करणारे विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीच्या मुलाचे मित्र असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र हा प्रकार रॅगिंगचा नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. महाविद्यालयाच्या होस्टेलमधील काही विद्यार्थ्यांनी टीव्ही सुरू करण्याची मागणी केली होती. त्यास महाविद्यालयानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा जवळ आल्याने टीव्ही बसविण्यास नकार दिला. त्यावरून किरकोळ वाद झाला असून, संबंधितांना समज दिल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले. विनाकारण दमदाटी करणे, मारहाणीची धमकी देणे असे प्रकार काही दिवसांपासून सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी त्याची माहिती लोकप्रतिनिधीच्या मुलाला दिली. त्यानंतर प्राचार्यांकडे तक्रार अर्जही सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)