शेतकऱ्यांच्या घरात सरकारचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:15 PM2018-04-08T23:15:06+5:302018-04-08T23:15:06+5:30

Government dark in farmers' house | शेतकऱ्यांच्या घरात सरकारचा अंधार

शेतकऱ्यांच्या घरात सरकारचा अंधार

Next


सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताºयाच्या सभेत विचारला.
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त गांधी मैदानावरील सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘जिल्हा बँकेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. असे असताना बँकेच्या भरती प्रक्रियेला स्टे आणला. केवळ युवकांची बेरोजगारी वाढावी, हाच हेतू विरोधकांचा असतो. आमचे सरकार असताना साताºयाच्या कोणत्याही समस्येबाबत शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे शरद पवारांना फोन करून विचारत होते. मात्र, आता कोण वाली आहे का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवार पुढे म्हणाले, ‘जीएसटीनं शेतकºयांचं अक्षरश: कंबरटे मोडले आहे. एवढेच नव्हे शेतकºयांच्या कंपोस्ट खतावरही जीएसटी लावण्यात आला आहे. आता शेतकºयांनी नेमकं करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. ज्या सोशल मीडियाचा वापर करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याच सोशल मीडियाचा दुहेरी वापर सध्या मोदींवर उलटला आहे. मोदी सरकारने जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यापलीकडे काहीच काम केले नाही. अशा प्रकारचे राष्ट्रवादी पक्ष कोणतेही राजकारण करत नाही. कोरेगाव-भीमा प्रकरणातही भाजप सरकाकडून ढिलाईपणा दाखविला गेला. मी उपमुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला होता. मात्र, या सरकारने पोलीस बंदोबस्त का दिला नाही, हे कोडे आहे. या प्रकरणातील मास्टर मार्इंड शोधला पाहिजे.’
कोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्'ाची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हे न उलगडणारे कोडे आहे.’
साताºयाचा मालक समजू नये : शिवेंद्रसिंहराजे
साताºयातील युवकवर्ग सुज्ञ असून, राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. त्यामुळे साताºयाचा मालक मी आहे, असे कोणी समजू नये, असा उपारोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता लगावला. सातारा जिल्ह्याचे चित्र वेगळं दाखविले जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष देऊन राष्ट्रवादीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Government dark in farmers' house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.