शासकीय गोदाम फोडले; गहू, तांदूळ घरात ठेवला, स्थानिक गुन्हे शाखेकडून पाचजण ताब्यात 

By नितीन काळेल | Published: December 15, 2023 09:29 PM2023-12-15T21:29:00+5:302023-12-15T21:29:55+5:30

१२ तासांत गुन्हा उघड : नागठाणेतील प्रकार

government godown was broken wheat rice kept in house five arrested by local crime branch | शासकीय गोदाम फोडले; गहू, तांदूळ घरात ठेवला, स्थानिक गुन्हे शाखेकडून पाचजण ताब्यात 

शासकीय गोदाम फोडले; गहू, तांदूळ घरात ठेवला, स्थानिक गुन्हे शाखेकडून पाचजण ताब्यात 

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : नागठाणे, ता. सातारा येथील शासकीय गोदामातून गहू आणि तांदळाची पोती चोरीचा गुन्हा बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत पाचजणांच्या मुसक्या आवळल्या. तसेच एकाच्या झोपडीवजा घरातून चोरीचे धान्य हस्तगतही करण्यात आले. अटक केलेले पाचही संशयित नागठाणे येथील रहिवाशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना केली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. असे असतानाच शुक्रवारी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना नागठाणे येथील गुन्हेगाराने गावातीलच शासकीय गोदामातील गहू आणि तांदूळ चोरुन झोपडीवजा घरात लपविल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे त्यांनी पथकास कारवाईची सूचना केली. त्यावेळी पोलिसांच्या रेकाॅर्डवरील जानवर शाैकत भोसले याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्याच्या झोपडवजा घरातून गहू, तांदूळ हस्तगत करण्यात आला. तसेच जानवर भोसले याच्या इतर चाैघा साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. शिवाजी शामराव मोहिते, विनोद सिकंदर मोहिते, वामन लिंबाजी माने आणि हेमंत हणमंत साळुंखे (सर्व रा. नागठाणे) अशी संबंधितांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक पतंग पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, हवालदार मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, मोहन नाचण, प्रवीण कांबळे, मोहसीन मोमीन, धीरज महाडिक, संकेत निकम आदींनी कारवाईत भाग घेतला.

खिडकीचे बार काढून १५ हजारांच्या धान्याची चोरी...

संशयितांनी १४ डिसेंबर रोजी शासकीय गोदामाच्या मुख्य शटर लगतच्या खिडकीची जाळी व लोखंडी बार काढून आत प्रवेश केला होता. त्यानंतर ५० किलो वजनाची गव्हाची ६ पोती आणि तांदळाचे ५० किलोचे एक पोते असे सुमारे १५ हजारांचे धान्य चाेरले होते. याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासांच्या आत धान्यासह संशयितांनाही ताब्यात घेतले.

 

Web Title: government godown was broken wheat rice kept in house five arrested by local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.