वाई तालुक्यात सामान्यांना शासकीयचा आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:55+5:302021-05-19T04:40:55+5:30

वाई : एप्रिल, मे मध्ये कोरोनाचा कहर वाढला होता. अनेक रुग्णांना बेड, व्हेन्टिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमी जाणवत ...

Government shelter for common people in Wai taluka | वाई तालुक्यात सामान्यांना शासकीयचा आसरा

वाई तालुक्यात सामान्यांना शासकीयचा आसरा

Next

वाई : एप्रिल, मे मध्ये कोरोनाचा कहर वाढला होता. अनेक रुग्णांना बेड, व्हेन्टिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमी जाणवत असून, उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटामुळे एक वर्षापासून छोटे व्यावसायिक, शेतकरी, कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांची ग्रामीण रुग्णालय शासकीय यंत्रणाकडून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला पहिली पसंती आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे सामान्य माणसाला आर्थिक अडचणीमुळे कठीण होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर जाण्यासारखी स्थिती आहे. वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही लक्षणीय वाढत आहे. तसेच राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

वाई तालुक्यात मे महिन्यात १८७३ रुग्ण सापडले असून, तालुक्यात शासकीय, खासगी व होम आयसोलेशनमध्ये ९९४ रुग्ण उपचार घेत आहेत; तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत शंभरच्याआसपास आकडेवारी येत असल्याने समाधानकारक परिस्थिती आहे.

राज्यासह देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली. लसीकरणाचा पाहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. आतापर्यंत वाई तालुक्यात ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे २२ हजारावर लसीकरण झाले असून, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाले असून, आतापर्यंत हजारहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

सध्या याठिकाणी एकूण १३३ रुग्ण उपचार घेत आहेत. शासकीय रुग्णालयात ८० ऑक्सिजन बेड, ७ व्हेंटिलेटर व शंभर साध्या बेडची सुविधा उपलब्ध आहे; तर तालुक्यात पाच खासगी रुग्णालयांत पन्नास ऑक्सिजन बेड, १३ व्हेंटिलेटर व शंभरहून अधिक साधे बेड असून, १५० रुग्ण उपचार घेत आहेत. काही अपवाद वगळता खासगी रुग्णालयातही रुग्णांची आर्थिक परस्थिती पाहून बिलाची रक्कम कमी-जास्त केली जाते.

चौकट

वाईतील कोविड सेंटर

वाई ग्रामीण रुग्णालय

कवठे रुग्णालय

मॅप्रो कोविड सेंटर

किसनवीर विलगीकरण

चौकट

शासकीय रुग्णालयात उपचार मोफत असून, खासगी रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपचारावर बिल आकारणी करावयाची आहे. जादा बिलाच्या तक्रारी निवारण करण्यासाठी कमिटी असून, बिलामध्ये अनियमितता आढळून आल्यास कारवाई केली जाते. - रणजित भोसले, तहसीलदार, वाई

Web Title: Government shelter for common people in Wai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.