कोरोनात नागरिकांना शासनाच्या गहू अन् तांदूळचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:49+5:302021-06-28T04:25:49+5:30
रामापूर : सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून मे आणि जून या दोन महिन्यांत शासनाच्या वतीने अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारक ...
रामापूर : सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून मे आणि जून या दोन महिन्यांत शासनाच्या वतीने अंत्योदय व प्राधान्यक्रम शिधापत्रिकाधारक सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्य पाटण तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर त्याच्या गावात वाटप करण्यात आले. या धान्याचा फायदा तालुक्यातील जवळपास दोन लाखांहून अधिक नागरिकांना झाला.
तालुक्यात कोरोनाच्या दुसरी लाटेचा प्रादुर्भाव हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात वाढू लागला. तो कमी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा काम करत होत्या. पण यश काही येत नव्हते म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन घेऊन कमी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत होते. यामुळे त्यांना किमान धान्य तर मिळाले पाहिजे म्हणून याच काळात मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार यांनी रेशनिंग कार्डवर मे आणि जूनमध्ये मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य शिधापत्रिकाधारक गहू आणि तांदूळ याचे वाटप त्यांच्या गावात आणि वाड्यावस्त्यांवर पोहोच करण्यात आले. याचा तालुक्यातील जवळपास अडीच लाख नागरिकांना फायदा झाला.
चौकट..
अंत्योदय कार्डसंख्या -३०३६
लाभार्थी संख्या - ११६९७
प्राधान्य कार्डसंख्या -४६५५०
लाभार्थी संख्या- २०९९९३
धान्यवाटप
गहू - ११३२६ क्विंटल
तांदूळ- ७५४६ क्विंटल