सरकारी पक्षाने तपासले ६५ साक्षीदार- महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून खटला

By admin | Published: September 3, 2014 11:09 PM2014-09-03T23:09:16+5:302014-09-04T00:06:26+5:30

दि. १५ रोजी होणार आरोपींचे जबाब

Government witnessed 65 witnesses - murder case of Maharashtra Kesar Sanjay Patil | सरकारी पक्षाने तपासले ६५ साक्षीदार- महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून खटला

सरकारी पक्षाने तपासले ६५ साक्षीदार- महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून खटला

Next

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून खटला न्यायालयात सुरू झाल्यापासून सरकार पक्षाच्या वतीने एकूण ६५ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या पुढे सरकार पक्षाला साक्षीदार द्यायचे नाहीत, असा अर्ज बुधवारी जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी न्यायालयात सादर केला. त्यामुळे आता दि. १५ रोजी अकरा आरोपींचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.
मागच्या सुनावणीवेळी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी संभाजी पाटील यांनी त्यावेळचे पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले होते. या खून प्रकरणाच्या कटाचा मुख्य सूत्रधार उदय पाटील असल्याचे त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र ते पत्र सध्या पोलिसांकडून हरविले आहे. त्यामुळे पत्र टंकलिखित करणारे हवालदार वसंत साबळे यांची साक्ष घ्यावी, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
या अर्जावर बचाव पक्ष आणि सरकार पक्षाचा बुधवारी दुपारी युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायाधीशांनी हा अर्ज दुय्यम पुरावा म्हणून न्यायालयात सादर करता येणार नसल्याचे स्पष्ट करत सरकार
पक्षाचा अर्ज फेटाळला.
(प्रतिनिधी

Web Title: Government witnessed 65 witnesses - murder case of Maharashtra Kesar Sanjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.